Friday, October 31, 2025

आरोग्य उपकेंद्राचा निधी हडपला! वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका बँक अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा.


केज (प्रतिनिधी): सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेतच मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील इस्थळ येथील आरोग्य उपकेंद्राच्या बळकटीकरणासाठी मंजूर झालेला ₹ १ लाख १६ हजार ६९४ चा निधी अधिकार नसताना परस्पर उचलल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

सन २०२४ या वर्षात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, इस्थळसाठी बळकटीकरणाचा निधी बँक खात्यात जमा झाला होता. या खात्यातून रक्कम काढण्याचा अधिकार इस्थळचे सरपंच आणि तात्कालीन आरोग्य सेविका (श्रीमती रेड्डी) यांना होता. मात्र, श्रीमती रेड्डी यांची बदली झाल्यानंतर आरोग्य सेविका मनीषा पानसरे यांना रक्कम काढण्याचे कोणतेही अधिकार नव्हते. तरीही, आरोग्य सेविका मनीषा पानसरे यांनी दि. १३ जून २०२४ रोजी आयडीबीआय बँकेच्या बनसारोळा शाखेतून ही संपूर्ण रक्कम काढल्याचे चौकशीत उघड झाले.

संगनमत आणि फसवणूक.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केलेल्या सखोल चौकशीत, मनीषा पानसरे यांनी बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाजुद्दीन कमरुद्दीन मोमीन यांच्या सांगण्यावरून आणि आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी (अज्ञात) यांच्याशी संगनमत करून सदर शासकीय निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनी संगनमत करून शासनाची १ लाख १६ हजार ६९४ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बँक अधिकाऱ्यांचा दावा: आम्हाला विनाकारण गोवले.

या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनी मात्र वेगळा दावा केला आहे. आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी दीपक कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा पानसरे यांना रक्कम देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीत सही नमुना बदलण्याचा अर्ज, चेक, ओळखपत्र आणि रक्कम देण्याचे पत्र बँकेकडे देण्यात आले होते. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून खात्री करूनच रक्कम देण्यात आली होती. बँकेकडे सर्व पुरावे असतानाही आपल्याला विनाकारण गोवण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

कॅनरा बँकेत धाडसी दरोडा मास्क, ग्लोज, गॅस कटर' वापर चोरट्यांचा भिंत तोडून बँकेत प्रवेश. दोन तासांत १८ लाख लंपास.


बीड (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील कॅनरा  बँकेत धाडसी दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल १८ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी पहाटे दीड ते सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी तोंडाला मास्क आणि हातात हँडग्लोज घातले होते. बँकेच्या पाठीमागील भिंत तोडून त्यांनी आत प्रवेश केला आणि त्यानंतर गॅस कटरने लॉकर तोडून रक्कम लंपास केल्याचा संशय आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, बीड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बुधवारी सर्व कामकाज संपवून सायंकाळी बँक बंद करण्यात आली होती. यावेळी जवळपास १८ लाख रुपयांची रोकड लॉकरमध्ये ठेवण्यात आली होती. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूची भिंत तोडली. त्यास मोठे छिद्र पाडून ते आत शिरले. आत प्रवेश केल्यानंतर लॉकर तोडण्यासाठी त्यांनी गॅस कटरचा वापर केला. साधारण दोन तास चोरटे हे काम करत होते. सर्व रक्कम हाती लागल्यानंतर ते सर्व साहित्य घेऊन पसार झाले. सकाळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शेजाऱ्याच्या बल्बवर झाकला कपडा.

बँकेच्या पाठीमागील बाजूस एका व्यक्तीने घरासमोर प्रकाश पडावा म्हणून बल्ब लावला होता. याचा प्रकाश बँकेच्या मागील बाजूस पडत असल्याने, चोरट्यांनी प्रथमतः या बल्बवर कपडा झाकला. त्यानंतर पाठीमागून छिद्र पाडून आत प्रवेश केला.

एलसीबी, पोलिसांचे पथक मागावर.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, बीड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनि बाळराजे दराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी लगेच वेगवेगळे पथक स्थापन करून तपासाला सुरुवात केली आहे.

बँकेत दोघेच, बाहेर किती?

सूत्रांच्या माहितीनुसार, बँकेमध्ये केवळ दोघांनीच प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज असल्याने हाताचे ठसे मिळू शकले नाहीत. आत दोघे असले तरी बाहेरही काही लोक मदतीला असण्याची शक्यता आहे. याचा शोध पोलिस घेत आहेत.

रेकी करून टाकला दरोडा.

एवढा धाडसी दरोडा लगेच येऊन टाकणे शक्य नाही. यासाठी आरोपींनी अगोदरच एक-दोन दिवस रेकी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस सीसीटीव्ही आणि इतर संशयितांची चौकशी करत आहेत.

डीव्हीआरही नेला काढून.

चोरट्यांनी प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तोंड वर छताकडे केले. त्यानंतर परत जाताना डीव्हीआरदेखील काढून नेला. त्यामुळे पोलिसांना शोध घेणे अवघड जात आहे. असे असले तरी पोलिस सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व कॅमेरे तपासत आहेत.

महानिरीक्षकांचे चोरट्यांकडून स्वागत.

विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र हे गुरुवारी बीड दौऱ्यावर होते. ते येण्यापूर्वीच चोरट्यांनी हा धाडसी दरोडा टाकला. मिश्र यांनी या घटनेचाही आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.

महिला बचत गटाचे क्षेत्रीय अधिकाऱ्याने वसूल केलेले १६ लाखांचे कर्ज कंपनीकडे जमा केले नाही.फसवणुकीचा गुन्हा दाखल


केज (प्रतिनिधी): महिलांच्या सक्षमी करणासाठी त्यांना अल्प व्याजदराने कर्ज देणाऱ्या एका फायनान्स कंपनीतील क्षेत्रीय अधिकाऱ्यानेच महिला बचत गटांकडून वसूल केलेल्या कर्जाच्या रकमेत मोठा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अधिकाऱ्याने ७९ महिलांकडून १६ लाखांहून अधिक रक्कम वसूल करून ती कंपनीच्या खात्यावर जमा केलीच नाही.

नेमके काय घडले?

केज येथील भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन लि. या कंपनीच्या शाखेत अरबाज रशीदखाँ पठाण (वय २७, रा. अजीजपुरा, केज) हा क्षेत्रीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने २३ ऑगस्ट २०२३ ते ३ मे २०२४ या कालावधीत केज तालुक्यातील महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची परतफेड म्हणून ७९ महिलांकडून हप्त्यापोटी एकूण ₹ १६ लाख ९ हजार ८६३ एवढी रक्कम रोख स्वरूपात जमा केली. मात्र, जमा केलेली ही रक्कम अरबाज पठाणने कंपनीच्या खात्यावर जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

७९ महिलांची फसवणूक आणि गुन्हा दाखल.

महिला बचत गट अत्यंत विश्वासाने आणि कष्टाने गोळा केलेले हप्ते वेळेवर भरत असताना, अरबाज पठाणने मात्र या पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली. केज येथील कंपनीचे शाखाधिकारी श्रीहरी मुळे यांनी बुधवारी (२९) केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून, क्षेत्रीय अधिकारी अरबाज रशीदखाँ पठाण याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (कलम ४०६, ४२०) नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपहारामुळे अल्पबचत गटातील महिलांना भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी येण्याची भीती व्यक्त होत आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत परळी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर : चित्राताई देशपांडे अध्यक्षा, विजयाताई दहिवाळ महिला प्रमुख व लीगल सेल प्रमुख - अ‍ॅड. अशोक शहाणे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा परळी वैजनाथची नवीन कार्यकारिणी आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. देवगिरी प्रांताध्यक्ष आदरणीय डॉ. विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत तालुका अध्यक्षा म्हणून चित्राताई देशपांडे, तर तालुका महिला प्रमुख म्हणून विजयाताई दहिवाळ यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष – श्री. रामेश्वर महाराज कोकाटे, सहउपाध्यक्ष – विद्या खिस्ते, सचिव – गोपाळ आंधळे, सहसचिव – संध्या सरोदे व प्रीती टाक, कोषाध्यक्ष – तारावती अग्रवाल, प्रचारप्रसिद्धी प्रमुख – श्री. पद्माकर उखळीकर, पर्यावरण प्रमुख – श्री. चेतन सौंदळे, लीगल सेल प्रमुख – अ‍ॅड. अशोक शहाणे अशी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास मोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अण्णा कोपूलवार उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पाहुण्यांचा सन्मान चित्रा देशपांडे, विजयाताई दहिवाळ, विद्या खिस्ते, तारावती अग्रवाल व संध्या सरोदे यांनी केला.
विजयाताई दहिवाळ यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची प्रस्तावना मांडत संस्थेचे ध्येय-उद्दिष्ट व वर्षभर झालेल्या बैठकींचा आढावा सादर केला. त्यानंतर चित्राताई देशपांडे यांनी विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सरोदे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अ‍ॅड. अशोक शहाणे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे यांनी ग्राहक पंचायतचे महत्त्व, समाजातील ग्राहक जनजागृती आणि संघटनेच्या कार्याची गरज याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. नवीन सदस्यांना संस्थेच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास श्री. दिलीप जोशी, जालंदर नाईकवाडे, जयश्री माने, अनिता मानवतकर, मंगल भोयटे, सुनंदा निर्मळे, सुनिता बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर परळी तालुक्यातील सर्व सदस्यांकडून नवीन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

छत्रपती संभाजी नगर मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी सर्व पदवीधारकांनी नाव नोंदणी करून घ्यावी - सौ. वर्षा मगर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे वातावरण चांगले निर्माण झाले सगळेच इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत याच काळात आता छत्रपती संभाजी नगर मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडून की ची प्रक्रिया डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे.
त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या वतीने पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू आहे. आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे.जो पदवीधर 1नोव्हेंबर 2022 रोजी कोणत्याही शाखेतून. राज्यातील कुठल्याही विद्यापीठातून पदवी पास झालेला आहे ते सर्व छत्रपती संभाजी नगर मराठवाडा पदवीधर मतदानास पात्र आहेत. तरी आधी नोंदणी केलेल्या असेल तरी सर्वानी नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे. तरी मराठवाड्यातील जास्ती जास्त मतदारांनी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. वर्षा मगर यांनी केले आहे.

Thursday, October 30, 2025

राष्ट्रीय तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी -प्रमोद झिंजाडे

नागपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू आणि हगवणे कुटुंबातील आत्महत्येच्या घटनांनी महिला आयोगांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दोन्हीही प्रकरणांमध्ये पीडित महिलांनी राज्य महिला आयोगाकडे लिखित तक्रारी दिल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
या पार्श्वभूमीवर  सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी केंद्र सरकारकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात राष्ट्रीय तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
झिंजाडे म्हणाले, “महिला आयोग हे राजकीय दबावाखाली कार्य करणारे नसून, महिलांना न्याय देणारे स्वायत्त संस्थान असले पाहिजे. म्हणूनच निवृत्त महिला न्यायाधीशच आयोगाचे नेतृत्व करावे.”

श्री राधा ही एक महान भावना आहे जी प्रत्येकामध्ये प्रकट होण्याची वाट पाहत आहे – साध्वी अदिती भारती


*देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या विवाह सोहळ्यात भाविक आनंदित

*श्रीमद् देवी भागवत महापुराण कथेचा आज भव्य समारोप; भाविकांची मोठी गर्दी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई येथे दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे सुरू असलेल्या श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ कथेचा आज भक्तीमय वातावरणात समारोप झाला. सहाव्या दिवसाच्या कथेदरम्यान कथाव्यास साध्वी अदिती भारतीजींनी गोदा देवीच्या जीवनकथेद्वारे देवी राधेचा गौरव केला आणि भाविकांना राधाभावाचे दिव्य दर्शन घडवले.
साध्वीजींनी दुर्वासा ऋषींच्या शापामुळे इंद्रदेवाची संपत्ती हरपणे, स्वर्गातून देवी लक्ष्मीचे अदृष्य होणे आणि समुद्रमंथनातून देवी सुरभी व देवी महालक्ष्मी यांचे प्रकट होणे या अध्यात्मपूर्ण कथा रसाळ शैलीत सांगितल्या. त्यांनी श्री राधेचा महिमा वर्णन करताना सांगितले की,“श्री राधा ही श्रीकृष्णाची आह्लादिनी शक्ती आहे. त्या केवळ एका युगापुरत्या नसून प्रत्येक भक्तामध्ये प्रकट होण्याची वाट पाहत असलेली एक महान भावना आहेत.”
मंगळवेढ्याच्या संतकन्या कान्होपात्रा यांनी आपल्या जीवनातून राधाभावाचे अप्रतिम दर्शन घडवले, असे सांगत साध्वीजींनी भक्तांना भक्तीची खरी अनुभूती दिली.
समुद्रमंथनाच्या प्रसंगाचे विश्लेषण करताना त्यांनी भक्तांना पुरुषार्थाचा खरा अर्थ समजावून सांगितला आणि धर्माधिष्ठित समृद्धीच खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रगतीचा पाया आहे यावर भर दिला. त्या म्हणाल्या, “आज जग भौतिक प्रगतीच्या शिडीवर चढत असताना व्यवस्थेतील अनेक क्षेत्रांत अस्थैर्य दिसून येते, कारण समृद्धीचा पाया अध्यात्माऐवजी केवळ पैशावर उभा आहे असे सांगितले.
कथेच्या समारोपाच्या वेळी देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संगीतमय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तीचा जल्लोष उसळला; भाविकांनी नृत्य, कीर्तन आणि जयघोषात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. किशन महाराज पवार (अध्यक्ष – मुकुंदराज महाराज मंदिर देवस्थान), श्री अर्जुन वाघमारे (तालुका प्रमुख, शिवसेना शिंदे गट), अ‍ॅड. मकरंद पत्की (अध्यक्ष, दीनदयाल नागरी सहकारी बँक), गणेश जाधव (शहर प्रमुख, शिवसेना शिंदे गट), श्री व सौ. अश्विनी साळुंके (संचालक, महेशचंद्र मंगल कार्यालय जवळगाव), श्री पूनमचंद परदेशी (ज्येष्ठ पत्रकार), श्री राकेश मोरे (महाविद्यालयीन संघ चालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), तसेच श्री महादेव गायकवाड (ग्रामीण तालुका संघ प्रमुख) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा विधी संपन्न झाला.
या प्रसंगी दिव्य ज्योती जागृती संस्थेचे प्रचारक स्वामीजी, साध्विजी व संस्थेचे अनेक सदस्य उपस्थित होते.
संस्थेची स्थापना दिव्य गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून ती ‘आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे मानवाचे आणि समाजाचे आमूलाग्र परिवर्तन’ घडविण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे. येथे केवळ देवाची चर्चा नाही तर शास्त्रांनी प्रमाणित केल्याप्रमाणे देवाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले जाते, हे वैशिष्ट्य भाविकांमध्ये श्रद्धा व आत्मिक जागृती निर्माण करणारे आहे.
अखेर देवी महालक्ष्मी व भगवान विष्णू यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होताना भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले, भक्तीभावाने भारलेले वातावरण संपूर्ण परिसरात पसरले.

Tuesday, October 28, 2025

उसतोड कुटुंबावर कर्नाटकात दुःखाचा डोंगर ट्रॉलीतून निसटून चिमुकलीचा चिरडून दुर्दैवी मृत्यू.


दिद्रुड (प्रतिनीधी): ऊसतोड कामगारांच्या स्थलांतराचा हृदयद्रावक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथील अडीच वर्षीय आरोही विशाल बडे या चिमुकलीचा कर्नाटक राज्यातील कोल्हारजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. एकुलती एक मुलगी अपघातात गमावल्याने बडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

देवदहिफळ येथील महादेव बडे हे ऊसतोड मुकादम आहेत. त्यांचे पुत्र विशाल बडे हे कर्नाटक राज्यातील बैलहोंगल तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे काम पाहतात. शुक्रवारी रात्री विशाल बडे हे पत्नी आरती, मुलगा अविराज आणि मुलगी आरोहीसह ट्रॅक्टरने कर्नाटकला कामासाठी निघाले होते. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या नशिबी येणारे हे स्थलांतरण या निष्पाप जीवासाठी अखेरचे ठरले.

आईच्या हातून निसटली 'कळी'

रविवारी सकाळी कोल्हारजवळ चहापाणी घेऊन हे कुटुंब पुन्हा साखर कारखान्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी आरोही समोरील ट्रॉलीत आपल्या आईच्या कुशीत बसली होती. मात्र, अचानक ती आईच्या हातातून निसटली आणि पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली आली. ट्रॉलीखाली आल्यामुळे आरोहीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आई-वडिलांनी केलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. एका क्षणात डोळ्यांदेखत त्यांचा छोटासा संसार उधळला गेला. कोल्हार येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी मध्यरात्री शोकाकुल वातावरणात देवदहिफळ येथे आरोहीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बडे कुटुंबावर तसेच देवदहिफळ गावावर शोककळा पसरली आहे. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतराचा धोका आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Monday, October 27, 2025

दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या वतीने आयोजित देवी भागवत कथा.शक्तीची जाणीव झाल्यावरच मनातील महिषासुरा चा नाश - साध्वी अदिती भारतीजी.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या वतीने अंबाजोगाई येथे सुरू असलेल्या सात दिवसीय श्रीमद् देवी भागवत ज्ञानयज्ञ कथेत तिसऱ्या दिवशी भव्य विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. मराठी भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर श्रद्धा-भक्तीने दुमदुमला.
या प्रसंगी कथाव्यास साध्वी अदिती भारतीजी यांनी महिषासुर वधाच्या प्रसंगाचे सखोल विवेचन करताना सांगितले की, “महिषासुर हा केवळ पौराणिक पात्र नाही, तर आज समाजात पसरलेल्या हिंसाचार, स्त्रियांवरील अत्याचार आणि दिशाभूल झालेल्या तरुणाईच्या रूपातील विकृत मनोवृत्ती हेच आधुनिक महिषासुराचे रूप आहे.”भारतीय धर्मग्रंथांमध्ये दडलेली असाधारण तत्त्वज्ञान आणि मातृशक्तीच्या उदात्त परंपरेचा उल्लेख करताना साध्वीजी म्हणाल्या, “इतिहासात जेव्हा-जेव्हा स्त्रियांवर अन्याय झाला, तेव्हा-तेव्हा शक्तिरूपिणी स्त्रीने अत्याचाराला आव्हान देत समाजपरिवर्तन घडवून आणले. राणी जिजाऊंपासून ते स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत अनेकांनी शक्तीचा जागर करून भारताची संस्कृती जपली असेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, महापुरुषांनी ब्रह्मज्ञानाद्वारे प्रत्येक हृदयात देवीची जागृती केली आणि मानसिक गुलामगिरीची बेडी तोडून समाजक्रांतीची प्रेरणा दिली. जयस्तुते, वंदे मातरमच्या सुरावटीत सभागृह देशभक्तीच्या उत्साहाने भरून गेले.
विजयादशमीचे महत्त्व स्पष्ट करताना साध्वीजी म्हणाल्या, “दरवर्षी विजयादशमीचा सण येतो, दुर्गादेवीची पूजा होते, रावण दहन होते; परंतु खरा विजय त्या दिवशी होईल जेव्हा मानवाच्या अंतर्मनात वास करणारा महिषासुर नष्ट होईल आणि सकारात्मकता व सद्भावनेने समाजात धर्मस्थापना होईल.” यासाठी सद्गुरुंनी दिलेल्या ब्रह्मज्ञानाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला श्री बबनभैया लोमटे, राहुल देशपांडे, प्रकाशजी तालमार्तंड बोरगांवकर सर, श्री नाना गायकवाड व मा. बळीरामजी चोपणे यांसह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घेतले.
 
अंबाजोगाईत घेण्यात येत असलेल्या या कथेस भाविकांची अलोट गर्दी उसळली असून, पुढील दिवसांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Friday, October 24, 2025

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयातील दीप - अभयकुमार ठक्कर

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे परळीत दिव्यांचा लख्ख प्रकाश. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – दीपावली पाडव्याच्या शुभप्रसंगी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने परळी वैजनाथ येथील पॉवर हाऊस समोरील विश्व हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात दिव्यांचा लख्ख प्रकाश करण्यात आला.
या वेळी परिसर फटाक्यांची आतिषबाजी करत “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे… जय भवानी जय शिवाजी,आवाज कुणाचा? शिवसेनेचा!” या गगनभेदी घोषणांनी दुमदुमला. चौकातील दिव्यांच्या तेजात आणि जयघोषांच्या गजरात बाळासाहेब ठाकरे यांच्या अजरामर कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमास शिवसेना मा.उपजिल्हाप्रमुख तथा मा.नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, युवासेना जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे, दैनिक जगमित्र चे संपादक बाळासाहेब कडबाने, ज्येष्ठ नेते सतीश जगताप, मा. नगरसेवक संजय कुकडे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मनीष जोशी, पत्रकार संतोष जुजगर, जगन्नाथ पवार, छ. शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाने, मोहन परदेशी,योगेश जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, सोमनाथ धोत्रे, शंकर शिंदे, बालू कुराडे, सतीश पवार, प्रकाश देवकर, विद्यार्थी सेना मा.तालुकाप्रमुख अमित कचरे, कारभारी शिंदे,जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे सहसचिव योगेश घेवारे, सोमनाथ गायकवाड यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अभयकुमार ठक्कर यांनी यावेळी सांगितले की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयातील दीप आहे. त्यांची विचारधारा हीच आमची दीपावली असून, त्यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्र उजळला आहे.”
या दीपप्रज्वलन सोहळ्यात जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात सहभाग घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

Wednesday, October 22, 2025

ऊसतोड मजुरांच्या मुलांकडे ४६५ कंटेनर ची मालकी, सामूहिक लक्ष्मीपूजन चर्चेत!


केज (प्रतिनिधी): एकेकाळी केवळ ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख होती. मात्र, अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सांगवी (सारणी) येथील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांनी हा कलंक पुसण्याचा विडा उचलला आहे. मालवाहतूक (कंटेनर) व्यवसायात उतरून त्यांनी गावासाठी एक नवी आणि प्रेरणादायी ओळख निर्माण केली आहे. आजमितीस या गावातील तरुणांकडे तब्बल ४६५ कंटेनरची मालकी असून, दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर येथे १६० कंटेनरचे सामूहिक लक्ष्मीपूजन करण्यात आले.

सामूहिक लक्ष्मीपूजन: एकतेचा संदेशसांगवी गावात एकूण ४६५ कंटेनरची मालकी असून, त्यापैकी १६० कंटेनर दिवाळीनिमित्त गावात उपलब्ध होते. जागेच्या उपलब्धतेअभावी सांगवी येथील 'माणुसमारी शेत', अशोक केदार यांचे शेत आणि पिंपळगाव फाटा येथील खुल्या जागेत अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी (दि. २१) सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून या कंटेनरचे सामुदायिक लक्ष्मीपूजन करण्यात आले. हभप अर्जुन महाराज लाड यांच्या हस्ते हे पूजन पार पडले. यावेळी सरपंच संजय केदार, जेष्ठ नेते दत्ता धस, उपसरपंच राम बिक्कड, रमाकांत धस यांच्यासह शेतकरी आणि कंटेनर मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत प्रत्येक कंटेनरचे पूजन करण्यासाठी मालक ताटकळत बसले होते.

४६५ कंटेनर! कोट्यवधींची उलाढालअवघ्या दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या या छोट्या खेड्यात बेरोजगार युवकांनी मालवाहतूक ट्रकच्या माध्यमातून उद्योगाचा एक यशस्वी पर्याय निवडला. आज या गावात तब्बल २५ ट्रान्सपोर्टची कार्यालये कार्यरत आहेत. सांगवीतील तरुण या कंटेनरद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यात मालवाहतुकीचे काम करतात. ४६५ कंटेनरच्या माध्यमातून महिन्याला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून या तरुणांनी केवळ स्वतःचा विकासच नाही, तर गावालाही समृद्धीच्या वाटेवर आणले आहे.

२०१५ पासून कंटेनर युगाची सुरुवातसांगवी गावात कंटेनर व्यवसायाची सुरुवात २०१५ मध्ये झाली. शेतकरी रामेश्वर केदार हे गावातील पहिले कंटेनर मालक ठरले. यानंतर गावात कंटेनर खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. सरपंच संजय केदार यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, "एकेकाळी ऊसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळख असलेल्या सांगवीतील ऊसतोड मजुरांच्या मुलांकडे आज ४६५ कंटेनरची मालकी आहे. त्यामुळे सांगवीची ओळख आता 'कंटेनरचे गाव' अशी झाली आहे."

निरक्षर बाबुराव केदार: यशाचे प्रेरणास्रोतसांगवीच्या यशातील एक अत्यंत प्रेरणादायी चेहरा म्हणजे निरक्षर बाबुराव केदार. दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा असलेल्या बाबुराव यांनी सुरुवातीला दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम केले. कष्टातून त्यांनी स्वतःची एक गाडी घेतली आणि आज त्यांच्याकडे तब्बल २५ कंटेनरची मालकी आहे. दर महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवताना त्यांच्या डोळ्यात परिस्थिती बदलल्याचा आनंद.दिसत होता, तसेच भूतकाळातील बिकट परिस्थिती आठवून त्यांना अश्रूही अनावर झाले.

संघर्षातून प्रगती१९९५-२०००: गावातील काही तरुण विविध वाहनांवर क्लीनर म्हणून काम करत होते. २००१: गावातील १५ तरुण चालक बनले. त्यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पुष्पक ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून कामाला सुरुवात केली. सध्या: याच कष्टाच्या बळावर आज हे तरुण स्वतःच्या कंटेनरचे मालक बनले असून, त्यांनी दाखवलेल्या एकत्रित संघशक्तीचा आदर्श वाखाणण्याजोगा आहे.

उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू.डॉक्टरच्या चुकीमुळे रुग्णाचा मृत्यू ?नातेवाईकांचा आरोप.


माजलगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी घडला. दरम्यान, त्यानंतर काहीवेळात डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच या ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दवाखान्यात धुडगुस घातल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. 

छत्रपती संभाजी महाराज चौकातील असलेल्या माऊली हार्ट केअर या हॉस्पिटलमध्ये काही दिवसापूर्वी राजेवाडी येथील बाळासाहेब बाबासाहेब बोबले या रुग्णाला छातीत दुखत असल्यामुळे सोमवारी सकाळी रुग्णालयात आणले होते. उपचारादरम्यान डॉ. राधाकृष्ण डाके चुकीचे उपचार व हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे बाळासाहेब बोबले याचा मृत्यू झाला असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शहर पोलिसात डॉ. राधाकृष्ण डाके यांचे विरोधात तक्रार दिली होती. दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धुडगुस घालून डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना घडली.

दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी शहर पोलिसात तक्रार दिल्याने शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करत मयताचे अंबाजोगाई मेडिकल बोर्डा समोर मंगळवारी शवविच्छेदन केले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने यांनी दिली.

याबाबत डॉ. राधाकृष्ण डाके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , सदरील रुग्णास पंधरा दिवसात दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता. यात त्याचा मृत्यू झाला. यात रुग्णाच्या नातेवाईकांची काही तक्रार नसून अज्ञात लोकांनी रुग्णालयात धुडगुस घातला.

Monday, October 20, 2025

लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी-सामग्रीची सविस्तर माहिती.


परळी वैजनाथ (कांतीकारी साथी)  महालक्ष्मी माता आणि श्री गणेश देवतेची कृपा मिळवण्यासाठी दिवाळी सणाचे दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मान्यतेनुसार दीपोत्सवातील लक्ष्मी पूजन केल्यास जीवनामध्ये सुख-शांती येते तसेच समृद्धीचाही आशीर्वाद मिळतो. यंदा लक्ष्मी पूजेच्या तारखेसंदर्भात लोकांमध्ये गोंधळ आहे. आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. यंदा आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 03:44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 05:54 वाजता तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे काही तज्ज्ञ 20 ऑक्टोबर तर काही ज्योतिषी 21 ऑक्टोबर तर काहींनी दोन्ही दिवशीही लक्ष्मी पूजन करण्याचा सल्ला दिलाय. 

तुमच्या ज्योतिषी गुरुजींनी किंवा तुम्ही जे पंचांग फॉलो करता त्यांनी जर 20 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्याचा सल्ला दिला असेल तर तशी पूजा करू शकता. 

दीपावली अमावस्या तिथी कालावधी

आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 03:44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 05:54 वाजता तिथी समाप्त होणार आहे.

दिवाळी लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त  

लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त 20 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7.41 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेपर्यंत आहे. 
प्रदोष काळ संध्याकाळी 6.12 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेपर्यंत आहे. 
वृषभ काळ संध्याकाळी 7.41 वाजेपासून ते रात्री 9.41 वाजेपर्यंत आहे. 

निशिता काळ मुहूर्त 

20 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:58 वाजेपासून ते उत्तररात्री 12:48 (AM, 21 ऑक्टोबर) वाजेपर्यंत आहे.
कालावधी : 49 मिनिटे 

लक्ष्मी पूजनासाठी लागणारी सामग्री. 

पूजेसाठी चौरंग किंवा पाट, चौरंगावर अंथरण्यासाठी नवे वस्त्र, केरसुणी, लक्ष्मीनारायणाची मूर्ती किंवा फोटो, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, फराळाचा नैवेद्य, सुक्या खोबरेच्या दोन वाट्या, खडीसाखर, बत्ताशे, साळीच्या लाह्या, पुरणाचा नैवेद्य, नारळ, गूळ, धणे, फळे, लक्ष्मीमातेची मूर्ती, श्री गणेशाची मूर्ती, सुटी नाणी, शंख, घंटा, आंब्याच्या डहाळ्या, कलश, पंचामृत इत्यादी.

लक्ष्मी पूजनाची मांडणी कशी करावी? 

  • देव्हाऱ्यासमोर दोन ते तीन मोठे पाट अथवा चौरंग ठेवावे. चौरंगावर पूजेसाठी आणलेले नवे वस्त्र अंथरावे.  
  • चौरंगावर स्वस्तिक काढावे, स्वस्तिकावर बाहेरून पूजा करून आणलेली नवी केरसुणी ठेवावी. 
  • कलशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन आंब्याचा डहाळ्यांवर श्रीफळ ठेवा. तांदळाच्या पूंजीवर कलश स्थापित करावा.
  • पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा मूर्ती ठेवा, त्यासमोर दोन स्वतंत्र विड्याच्या पानावर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवा.
  • पूजेसमोर नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, सुक्या खोबऱ्याच्या एका वाटीमध्ये खडीसाखर, दुसऱ्या वाटीमध्ये बत्ताशे, साळीच्या लाह्या, पुरणाचा नैवेद्य, नारळ, गूळ, धणे, फळे इत्यादी गोष्टी मांडा.
  • लक्ष्मी-नारायणच्या फोटो किंवा मूर्तीशेजारी कुलदेवतेचा टाक ठेवावा.
  • त्याच्यासमोरील बाजूस चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे, त्यासमोर पैसे, सोने, चांदी, इत्यादी गोष्टी मांडा 
  • पूजेच्या समोर मधोमध आपल्या देवघरातील श्री गणेशांची मूर्ती, स्वतःच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी.
  • सर्व गोष्टींना हळद-कुंकू अक्षता फुले अर्पण करा, निरांजन ओवाळावे. 
  • पूजा मांडणी करुन झाल्यानं विधीवत पूजा-आरती-प्रार्थना करावी, प्रसादाचे वाटप करावा.  
  • दुसऱ्या दिवशी पूजेचे उद्यापन करावे आणि पूजा साहित्य निर्माल्य प्रवाहित करावे.  


परळी शहर पोलिसांचा प्रशंसनीय कामगिरी.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सायबर तपासाच्या माध्यमातून हरवलेले 22 मोबाईलचा शोध.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)परळी शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या दक्षतेची आणि जबाबदार कार्यपद्धतीची झलक दाखवत प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. शहरातील विविध भागातून हरवलेले किंवा चोरीला गेलेले 22 मोबाईल फोन शोधून काढत सुमारे 4 लाख 58  हजार रुपयांचे मौल्यवान मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.  ही कामगिरी परळी शहर पोलिस ठाण्याचे *पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन* यांच्या नेतृत्वाखाली, तपाशी अधिकारी *पोलीस अमलदार कैलास कोलमवाड* व त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमातून साध्य झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सायबर तपास आणि संयमित प्रयत्नांमुळे पोलिसांना हे यश मिळाले आहे. हरवलेल्या मोबाईलचा शोध लागल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, परळी शहर पोलिसांच्या या जनहितकारी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सामाजिक माध्यमांतून व प्रत्यक्ष भेटून पोलीस दलाचे अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, पोलिस यंत्रणा केवळ गुन्हेगारांना पकडण्यासाठी नाही तर नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठीही तितकीच कटिबद्ध आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 परळी शहर पोलिसांनी दि.16 ऑक्टोबर 2025 रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात मोबाईल मुळ मालक तक्रारदार यांना मोबाईल शहर पोलीस ठाण्याचे *पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन* यांच्या हस्ते परत केले. *यावेळी पोलीस अमलदार कैलास कोलमवार, पोलीस हवालदार गोविंद कांदे, विष्णू फड, बलाजी दराडे, मुजमुले, पोलीस कर्मचारी किशोर घटमल, वाहतूक शाखेचे प्रल्हाद भताने आदींची उपस्थिती होती.* मोबाईल हरवलेल्या तक्रारदारांनी  पोलीसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले असुन पोलीसांचे आभार मानले आहे. त्यामुळे पोलीसांची जनमानसात चांगली प्रतीमा निर्माण होण्यास नक्कीच मदत झाली आहे.

      *सदरची कारवाई बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेष शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ नाचण, पोउपनि शिंगणे, पोलीस अंमलदार कैलास कोलमवाड, पो.अ. प्रशांत शेळके तसेच टेक्निकल अॅनेलीसेस बीड येथील पोलीस अंमलदार विकी सुरवसे यांनी केली आहे.* परळी शहर पोलिसांचे हे यश केवळ आकड्यांत मर्यादित नसून, त्यांच्या कार्यनिष्ठा, जबाबदारी आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. *"रक्षक तेच खरे सेवक"* या उक्तीला साजेसं काम परळी पोलिसांनी करून दाखवलं आहे. पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशाच तळमळीने काम करत राहावे! *परळी शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Friday, October 17, 2025

बीडच्या झमझम कॉलनीत अडीच लाखा चा गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) शहरातील झमझम कॉलनी मध्ये प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहिती आधारे पोलिसांनी पत्र्याच्या शेडवर मारलेल्या छाप्यात अडीच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी अवैध धंद्या विरोधात कारवाई करण्यासाठी आदेशित केले आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या कारवाया करणे सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेला पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा साठवून ठेवल्याची गूप्त माहिती मिळाली होती. या माहिती आधारे पोलिसांनी दुपारी पाच वाजेच्या सुमारास पत्र्याच्या शेड वर छापा मारला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये 2 लाख41 हजार 875 रुपयांचा गोवा गुटखा जप्त करण्यात आला.
सय्यद अजमदउल्ला याने सय्यद रजाउल्लाह याच्या सांगण्यावरून पत्र्याच्या शेडमध्ये पांढ-या रंगाच्या 15 गोण्यामध्ये गोवा गुटखा विक्रीसाठी ठेवला होता. दरम्यान याप्रकरणी दोघाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गोविंद राख, बागवान, राहुल शिंदे, अंकुश वरपे,आनंद मस्के, स्वाती मुंडे, बबन सलगर, अलीम शेख, सुनिल राठोड यांनी केली.

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ! मनपा आयुक्त संतोष खांडेकर दहा लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.


जालना (प्रतिनिधी) - जालन्याचे महापालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर हे दहा लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मोठे अधिकारी अशी लाच घेऊन कामे करत असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न या छाप्यानंतर उपस्थित होत आहे. 

एका खाजगी ठेकेदाराकडून हि लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हि कार्यवाई केली आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी वकील रिमा खरात यांनी केली आहे. आयुक्तांनी गोरगरीबांची घरे पाडली याचा हा परिणाम आहे. हि कार्यवाही योग्य असल्याचे वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठेकेदाराचे बील काढण्यासाठी हि लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली यानंतर हि मोठी कार्यवाई करण्यात आली. कारवाईनंतर आयुक्तांच्या शासकीय बंगल्याची झाडाझडती सुरू होती.

बिग ब्रेकिंग! आ.शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन.


अहिल्या नगर (प्रतिनिधी)  नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले (वय ६५) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शिवाजी कर्डीले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिले असून, कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकरी वर्गासाठी अनेक योजना राबवल्या होत्या.

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर या गावातील शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. दूध उत्पादक शेतकरी, गावात सरपंच, आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा मोठा राजकीय प्रवास राहिला आहे.

कोण होते शिवाजीराव कर्डीले?

शिवाजीराव कर्डीले २००९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उभे होते. त्यांनी ५७ हजार ३८० मतं मिळवून विजय संपादन केला होता. २०१४ मध्येही ९१ हजार ४५४ मतांनी विजय मिळवला होता.

सुरुवातीला त्यांनी आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ ते गावचे सरपंच राहिले होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्याभरात झाले. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभा घेतली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

Saturday, October 11, 2025

शुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना.आठ जणांवर गुन्हा दाखल.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ अंबा येथील युवकावर शुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील तरुण शेतकरी पंडित सोनवणे हा त्याच्या चिबड नाव असलेले शेतामध्ये सोयाबीनची काढणे करण्यास काही मजुरांना सोबत घेऊन गेला होता. त्यावेळी त्याला त्याच्या शेतामध्ये वाळलेली बाभळ खाली पडलेले आढळून आली. ती वाळलेली बाभळ बाजूला उचलून बांधावर टाकली असता शेजारी शुभम सोनवणे याने भांडणास सुरुवात केली. कुरापत काढून तू ही वाळलेली बाभळ बांधावर का टाकलीस असे म्हणून पंडित सोनवणे याच्याशी वाद घालून शिविगाळ करून वाद वाढला. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
 
शुभम सोनवणे आणि त्याच्या इतर सात साथीदारांनी मिळून पंडित बाळासाहेब सोनवणे यास लाठी काठी फायटर वायरच्या साहाय्याने जबर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गोविंद संतराम सोनवणे, राहुल हरिचंद्र सोनवणे, शुभम विलास सोनवणे, विलास संतराम सोनवणे, अनिता विलास सोनवणे आणि विलास सोनवणे याचे इतर मित्र यांच्या विरोधात युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 118 (2 ), 118 (1), 115 (2), 3 52, 352 (2), 3 5 1 (2), 189 (2), 189 ( 4 ), 191 (2), 191 (3), 190 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास युसूफ वडगाव पोलीस करत आहे. अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पीडित कुटूंब दहशतीमध्ये आहे

ह.भ.प.अर्जुन महाराज लाड गुरुजी हे वारकरी परंपरेचे खरे सेवक- रामेश्वर महाराज कोकाटे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वारकरी परंपरेच्या अखंड भक्तिरसात न्हालेल्या लाडेवडगाव ग्रामस्थांनी ज्ञानेश भक्त अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या ६१व्या महोत्सवानिमित्त भव्य “राम कृष्ण हरी” सप्हाचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने केले. या प्रसंगी अख्खे लाडेवडगाव “राम कृष्ण हरी” च्या गजराने दुमदुमले.
सप्हाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या वतीने अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा सत्कार रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंद महाराज मुंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून मानाचा सत्कार करण्यात आला.
या वेळी आपले विचार व्यक्त करताना रामेश्वर महाराज कोकाटे म्हणाले की, अर्जुन महाराज लाड गुरुजी हे वारकरी परंपरेचे खरे सेवक आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ‘ज्ञानेश्वर माऊली’ आणि ‘नामस्मरण’ यासाठी वाहिले आहे. त्यांच्या ६१व्या महोत्सवानिमित्त संपूर्ण परिसरात जो भक्तिरस निर्माण झाला, तो वारकरी चळवळीच्या तेजाला अधिक बळ देणारा आहे. अशा गुरुजनांच्या आशीर्वादानेच समाजात आध्यात्मिकता आणि सद्भावना टिकून राहते असे ते म्हणाले.
या प्रसंगी दत्ता महाराज पुरी, करण महाराज मुंडे यांच्यासह अनेक संत-महंत, वारकरी, भाविक भक्त तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात नामस्मरण, भजन, कीर्तन आणि वारकरी परंपरेचा उत्साह यांचा सुंदर संगम झाला. संतांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. शेवटी उपस्थितांनी गुरुजींना पुढील वाटचालीसाठी आरोग्य, समाधान व दीर्घायुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि शुभेच्छा अर्पण केल्या.

परळीत खळबळ जनक घटना गुरूकुलात घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण चालका च्या वडिलांवरही हल्ला.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  शाळेतून गुरूकुलाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटेत अडवत परीक्षेचा पेपर का दिला नाही म्हणून रागाच्या भरात दोन हल्लेखोर तरुणांनी सुरुवातीला धक्काबुक्की केली. त्यांनतर गुरूकुलात घुसून ११ विद्यार्थ्यांना बेल्ट व बांबूने जबर मारहाण केल्याची घटना परळी शहरातील सिद्धेश्वरनगर भागातील नर्मदेश्वर गुरुकुलात शुक्रवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यांनतर गुरूकुल चालकाच्या वडिलांवरही तरुणांनी हल्ला केला असून, त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

परळी शहरातील संभाजीनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता तक्रार देण्यात आली आहे. दिनेश रावसाहेब माने (रा. ४० फुटी रोड, परळी) व बाळू बाबूराव एकीलवाळे (रा.सिद्धेश्वरनगर, परळी) अशी दोन्ही हल्लेखोरांची नावे आहेत.

परळीच्या सिद्धेश्वरनगरात अर्जुन महाराज शिंदे यांचे तीन वर्षांपासून श्री. नर्मदेश्वर गुरुकुल आहे. या गुरुकुलात ४२ विद्यार्थी भजन, कीर्तन, मृदंगाचे शिक्षण घेऊन कृष्णानगर व गणेश पार रोडवरील शाळेत औपचारिक शिकतात. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता काही मुले कृष्णानगर शाळेतून गुरूकुलात जात असताना त्यांना वाटेत दिनेश माने व बाळू एकीळवाले या दोन तरुणांनी अडवून परीक्षा पेपर का दिला नाही म्हणून रागात धक्काबुक्की केली. त्यांनतर दोन तरुणांनी गुरूकुलात घुसून साहित्याची तोडफोड करत ११ विद्यार्थ्यांना बेल्ट व बांबूने मारहाण केली. या मारहाणीत रोहन, कृष्णा, प्रणव, वैभव, वरद यांच्यासह एकूण ११ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात दोन्ही युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी दिली.

हल्लेखोरांनी वैयक्तिक वाद नाही.

गेल्या तीन वर्षांपासून आम्ही गुरुकुल चालवत असून, आमचा हल्लेखोरांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. तरीदेखील हल्लेखोर युवकांनी गुरुकुलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना आणि माझ्या वडिलांवर हल्ला केला.-अर्जुन महाराज शिंदे, संस्थाचालक, नर्मदेश्वर गुरुकुल, परळी

गुरूकुलातील हल्ल्याचा घटनाक्रम.

सकाळी ११.४० वाजता : परळी शहरातील कृष्णानगर येथील शाळेतून सिद्धेश्वरनगर गुरूकुलात जात असतांना दोन युवकांनी रस्त्यात आडवून काही विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली.सकाळी ११.४५ : नर्मदेश्वर गुरूकुलात घुसलेल्या दोन युवकांनी गुरूकुलातील ११ विद्यार्थ्यांना बेल्ट व बांबूने जबर मारहाण केली.दुपारी १२.३० : गुरूकुलातील ११ मुलांना संस्थाचालक अर्जुन महाराज शिंदे हे परळीतील दवाखान्यात घेऊन गेल्यांनतर गुरूकुलात एकटे असलेले त्यांचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावर दोन हल्लेखोर युवकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले असून, अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

बीडच्या जेलरकडून कैद्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न? विशेष पथकाकडून पाच तास चौकशी. पेट्रस गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार.

बीड (प्रतिनिधी) येथील जिल्हा कारागृहामध्ये अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर कैद्यांचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काही कैद्यांकडून झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कारागृह उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळीच बीडमध्ये येऊन पाच तास कसून चौकशी केली. यावेळी चाैकशीवरून दोन अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.

जेलर गायकवाड यांनी तीन कैद्यांना विशिष्ट धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यास सांगणे, तसेच काही कैद्यांना प्रार्थना करण्यास भाग पाडणे, असे प्रकार केले असल्याचा आरोप आहे. या प्रकाराची तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर हे तपास पथक बीडमध्ये आले. पथकाने जेलर पेट्रस गायकवाड यांच्यासह तुरुंगातील तीन कैद्यांचे जबाब नोंदवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पथकाने कारागृहातील संबंधित कैद्यांशी थेट संवाद साधून त्यांच्याकडून या आरोपांची सत्यता पडताळली. चौकशीदरम्यान खडाजंगी झाल्याचीही माहिती आहे. या गंभीर आरोपामुळे जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. चौकशी पथक आता या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही करणार असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासकीय स्तरावर मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा कारागृहातील या घटनेमुळे बीडच्या प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, उपमहानिरीक्षक निती वायचाळ यांना संपर्क केला. परंतु त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.

गायकवाड यांना कोणाचे अभय?

पेट्रस गायकवाड हे विनापरवाना वृक्षतोड, कैद्याकडून वाहन धुवून घेणे अशा कारणांमुळे आगोदरच वादात सापडले होते. त्यानंतर आता त्यांच्यावर धर्मांतर करण्याचे आरोप झाले आहेत. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक बीडमध्ये येऊन केवळ चौकशी करून जात आहे. परंतु पुढे याचे काय होते? हे समजत नाही. त्यामुळे गायकवाड यांना कोणाचे अभय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Thursday, October 9, 2025

मा.मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त.राज्यपाल बागडे यांच्या उपस्थितीत.अभिष्टचिंतन सोहळा.


गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार , दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ (नाना) बागडे, श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील यांच्या शुभहस्ते शिवाजीराव पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार असून यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.

गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि.३ ऑक्टोबर पासून गेवराई शहरात श्रीमद्‌‍ भागवत कथा आणि भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भावरत्न समाधान महाराज शर्मा यांच्या मधूर वाणीतून सुरु असलेल्या भागवत कथेमुळे गेवराईचे वातावरण भक्तिमय झाले आहे. अनेक नामांकित किर्तनकारांची सेवा सप्ताहभर सुरु आहे.

शुक्रवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ (नाना) बागडे यांच्या हस्ते
माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडीचे ह.भ.प. महादेव महाराज यांच्यासह साधु, संत-महंत आणि गेवराई तालुक्यातील वारकरी सांप्रदायात काम करणारे किर्तनकार, गायक, वादक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत

माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्व साधु, संत-महंत, किर्तनकार यांचाही हृदय सत्कार अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या भव्य सत्कार समारंभानंतर ह.भ.प.शिवाजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही आयोजन समितीने केले आहे.

शिवाजीराव पंडित आणि शिवछत्र परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून किर्तन महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे. र.भ.आट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या शिवनगरीत गेल्या सप्ताहभर सुरु असलेल्या किर्तन महोत्सवाला भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuesday, October 7, 2025

संगम येथे कोजागिरी पौर्णिमा भक्ती गीत भजन गाऊन उत्साहात साजरी.

परळी वैजनाथ (वार्ताहर)   आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा ही कोजागरी साजरी करण्यात आली. ही पौर्णिमा हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची मानली जाते आणि तिच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन संगम येथे कोकाटे महाराज परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व यावेळी जनाई महाराज कोकाटे यांनी सांगितले
कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि "को जागर्ति" (कोण जागा आहे) असे विचारते, म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध धार्मिक विधी केले जाते भजन गाऊन दूध तापविले जाते चंद्राचे किरण यामध्ये दुधामध्ये पाहाण्याचे महत्त्व आहे असं कोजागिरी पौर्णिमा चे उत्सवाचे स्वरूप आहे लक्ष्मी पूजा घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये देवी लक्ष्मीची पूजा करण्यात आली.
- दुग्ध पौर्णिमा काही ठिकाणी दुग्ध पौर्णिमा म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो, जेथे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे महत्त्व असते.
- *सांस्कृतिक कार्यक्रम*: विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, अभंग गवळण भावगीत भक्ती गीत भजन,  आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  या ठिकाणी जनाई महाराज कोकाटे यांच्या मधुर आवाजातून सर्वांना मार्गदर्शन भेटले अभंग गाऊन मंत्रमुग्ध केले सुरेश मोरे सर बब्रुवाजी गिराम आनंदी कोकाटे यांनी सुंदर मृदंग वाजविला श्रावणी कोकाटे यांनी गोड असं गायन केलं अंकिता चव्हाण यांनी सुंदर गवळणी सादरीकरण केल्या यावेळी सर्व गावातील भजनी मंडळ उपस्थित होते
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा यावेळी रामेश्वर महाराज कोकाटे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या
 या दिवशी केलेली पूजा आणि उपवास धनधान्य आणि सुखसमृद्धी प्रदान करतात
विशेष उपक्रम मंदिरांमध्ये विशेष पूजा  मंदिरांमध्ये आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते घरी लक्ष्मी पूजा‌लोकांनी आपापल्या घरी देवी लक्ष्मीची पूजा केली आणि आरत्या केल्या बरोबर बारा वाजता भैरवी या रागाने सांगता करण्यात आली आणि सर्वांनी दूध ताकविलेले सर्व मसालेदार पदार्थ टाकून गोड असं दूध सर्वांनी प्राशन केले या दुधाचा आनंद सर्वांनी घेतला सर्वांचे आभार रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मांडले

राज्य सरकारची मोठी घोषणा! पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर.


मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचे आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. अशा स्थितीत पीक करपून गेले, पाण्याखाली गेले, जमीन खरडून गेल्याने पुन्हा पेरणीची स्थितीही उरली नाही. आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना झाला. त्याची शंभर टक्के भरपाई कुणीच देऊ शकत नाही परंतु शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी पॅकेज तयार केले आहे. ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. २९ जिल्हे आणि २५३ तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले आहेत. जिथे पिकांचे नुकसान झाले तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींची मदत जाहीर केली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जातील, ५० हजार रूपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल. खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ६१७५ कोटी रूपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत. बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल. कोरडवाहू शेतकऱ्यांना १८ हजार ५०० रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना २७ हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० हेक्टर मदत दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना १७ हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने ३१ हजार ६२८ कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

प्रकारमदतीचा तपशीलप्रति हेक्टर मदत रक्कम (₹)नोंद / स्रोत
एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत₹ 6,175 कोटीराज्य सरकारकडून जाहीर
कोरडवाहू शेतकरीशेतीकामासाठी मदत₹ 18,500प्रति हेक्टर
हंगामी बागायतदार शेतकरीहंगामी बागायती शेतीसाठी मदत₹ 27,000प्रति हेक्टर
बागायती शेतकरीकायम बागायती शेतीसाठी मदत₹ 32,500प्रति हेक्टर
बियाणे व इतर कामांसाठी सर्वसाधारण मदतसर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी₹ 10,000प्रति हेक्टर
पीक विमा उतरवलेले शेतकरीविम्याद्वारे मदत₹ 17,000प्रति हेक्टर (विम्यातून)
राज्य सरकारचे एकूण मदत पॅकेजशेतकरी मदत आणि पुनर्बांधणीसाठी निधी₹ 31,628 कोटीसरकारकडून जाहीर पॅकेज

दरम्यान, आम्ही तिघांनी बसून या पॅकेजवर चर्चा केली. शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट असल्याने इतर ठिकाणचे चार पैसे कमी केली तरी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सीएसआर फंड काही जण द्यायला तयार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले जातील. अजूनही काही मदतीची गरज असेल तिथे मदत करण्याची तयारी शासनाची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

खळबळजनक! कत्तलीसाठी जाणारी १५ नवजात वासरे; महागड्या कारचा अपघात होताच गोमाफीयांचा क्रूर धंदा उघड!


आष्टी (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील शेरी बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातामुळे नवजात वासरांच्या कत्तलीसाठी होणारी क्रूर तस्करी उघड झाली आहे. अपघातात सापडलेल्या महागड्या कारमध्ये १५ निष्पाप वासरे अत्यंत अमानुषपणे कोंबून नेली जात होती.

मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास (एम.एच २०,बी.क्यू.३२३२) क्रमांकाची एक महागडी कार अहिल्यानगरहून परळीच्या दिशेने जात असलेल्या दुसऱ्या एका चारचाकी वाहनाला पाठीमागून धडकली. धडक एवढी जोरदार होती की, वासरांची तस्करी करणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या शुभम रमेश रासकर यांच्या शेडमध्ये घुसली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. अपघातग्रस्त कारची पाहणी केली असता आतमध्ये जे दृश्य दिसले, त्याने उपस्थितांचे हृदय हेलावले. कारमध्ये १५ नवजात वासरे निर्दयपणे कोंबलेली होती. त्यांच्या तोंडाला टेप लावली होती आणि पळून जाऊ नये म्हणून पाय बांधलेले होते.

नागरिकांची तत्परता आणि पोलिसांची धाव.

अपघातग्रस्त वासरांना नागरिकांनी तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे, अशोक मुटकुळे, दादासाहेब सोनवणे, अजिनाथ सोनवणे यांच्यासह अनेक तरुणांनी वासरांच्या तोंडाची टेप आणि पाय बांधलेले दोर सोडले. यातील काही वासरांना गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर आणि अमोल नवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून वासरांना ताब्यात घेतले आहे. गोमाफीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या वासरांना पुढील उपचारासाठी आणि सुरक्षिततेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील गोशाळेत स्वाधीन करण्यात येणार आहे.

गोमाफीयांवर मकोका लावा.

या घटनेनंतर गोमाफीयांच्या वाढत्या क्रूर कृत्यांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी या तस्करीला आळा घालण्यासाठी कडक मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "तालुक्यात यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील गोमाफीया या रस्त्यावरून सुसाट जातात. अशा क्रूर गोमाफीयांवर आता 'मकोका' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.

Monday, October 6, 2025

आई-वडील शेतात उकिरड्याच्या खड्यातील पाण्यात बुडून ७ वर्षीय चिमुकलीचा हृदयद्रावक मृत्यू.

केज (प्रतिनिधी): तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील बजगुडे वस्तीवर रविवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराशेजारी उकिरड्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून आर्या अमोल बजगुडे (वय ७) या पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात आणि बजगुडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नेमके काय घडले?

आर्याचे आई-वडील, अमोल बजगुडे आणि त्यांची पत्नी, हे दोघेही रविवारी शाळेला सुट्टी असल्याने आर्याला घरी ठेवून घराशेजारील शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आर्या खेळता खेळता घराजवळील उकिरड्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ गेली. या खड्यात पावसाचे पाणी साचले होते. अचानक, आर्याचा तोल गेला आणि ती साचलेल्या पाण्यात पडली. बराच वेळ होऊनही आर्या न दिसल्याने आईने घरी धाव घेतली. तेव्हा आर्या खड्यातील पाण्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.

उपचारापूर्वीच 

मृत्यूआर्याच्या आईने तात्काळ तिला पाण्यातून बाहेर काढले. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. घाबरलेल्या आई-वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता तिला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच नाका-तोंडात पाणी जाऊन आर्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या या चिमुकलीच्या अशा अचानक जाण्याने बजगुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, बजगुडे वस्तीवर आणि चिंचोलीमाळी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर. परळी सर्वसाधारण महिला राखीव.

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली.यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.दरम्यान, ३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे.

१४७नगरपंचायत अध्यक्षांचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. एकूण महिलांसाठी ७४ जागा राखीव त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी ३८ जागा अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी ७, मागासवर्ग प्रवरगास २० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर –

देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित

मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित

ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित

वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित

भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित

घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित

चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित

शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित

सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित

मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित

अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित

बीड – महिला प्रवर्ग आरक्षित

शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात या नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर –

भडगाव (जळगाव)

वणी

पिंपळनेर (धुळे)

उमरी (नांदेड)

यवतमाळ

शेंदूरजनघाट

ओबीसीसाठी आरक्षित झालेल्या नगरपरिषद –

६७ जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यातील ३४ महिला ओबीसी काढल्या जाणार.

तिरोडा

वाशिम

धामणगाव

भोकरदन

भद्रावती

परांडा

भगूर

मालवण

नंदुरबार

खापा

वरोरा

हिंगोली

मोर्शी

शहादा

उमरेड

नवापूर

त्र्यंबक

कोपरगाव

हिवरखेड

बाळापूर

शिरूर

कुळगाव ( बदलापूर )

मंगळूरपीर

कन्हान पिंपरी

पाथर्डी

देगलूर

नेर नबाबपूर

धाराशिव

इगतपुरी

रामटेक

माजलगाव

नाशिराबाग

पालघर

मूल

वरणगाव

बल्हारपूर

मलकापूर (बुलढाणा)

इस्लामपूर

जुन्नर

कुरडुवाडी

मोहपा

तुमसर

औसा

महाड

मुरुड जंजिरा

अकोट

चोपडा

सटणा

काटोल

गोंदिया

सांगोला

दौंड

राहता

श्रीवर्धन

रोहा

ब्रम्हपुरी

देसाईगंज

येवला

कुलगाव

कर्जत

दौंडाईचा वरवडे

कंधार

शिरपूर वरवडे

खुला महिला प्रवर्ग नागपरिषदेची सोडत जाहीर

परळी वैजनाथ

मुखेड

आंबरनाथ

अचलपूर

मुदखेड

पवनी

कन्नड

मलकापूर(कोल्हापूर)

मोवाड

पंढरपूर

खामगाव

गंगाखेड

धरणगाव

बार्शी

अंबड

गेवराई

म्हसवड

गडचिरोली

भंडारा

उरण

बुलढाणा

पैठण

कारंजा

नांदुरा

सावनेर

मंगळवेढा

कळमनुरी

आर्वी

किनवट

कागल

संगमनेर

मुरगूड

साकोली

कुरुंदवाड

पूर्णा

कळंब

चांदुररेल्वे

चांदुरबाजार

भूम

रत्नागिरी

रहिमतपूर

खेड

करमाळा

वसमत

हिंगणघाट

रावेर

जामनेर

पलूस

यावल

सावंतवाडी

जव्हार

तासगाव

राजापूर

सिंदिरेल्वे

जामखेड

चाकण

शेवगाव

लोणार

हदगांव

पन्हाळा

धर्माबाद

उमरखेड

मानवत

पाचोरा

पेण

फैजपूर

उदगीर

अलिबाग

अनुसूचित जातींसाठी महिला सोडत जाहीर

बोधनी रेल्वे

नीलडोह

गोंडपिंपरी

अहेरी

बेसापिंपळा

कोरची

ढाणकी

धानोरा

बहादूरा

नगरपंचाईत अनुसूचित जमातींसाठी महिलांसाठी जागा जाहीर

भिवापूर

अर्जुनी(मोरगाव)

देवळा

समुद्रपूर

सिरोंचा

हिंगणा

पाली

नगर पंचायत मागास प्रवर्गासाठी महिलांची सोडत जाहीर

पोलादपूर

तलासरी

आष्टी

बीड

वढवणी

कळवण

घनसावंगी

सावली

कर्जत अहिल्यानगर

मारेगाव

पाटोदा

खालापूर

मंचर

भामरागड

शिरूर अनंतपाड

माढा

जाफ्राबाद

जिवती

आष्टी(वर्धा)

चाकूर

मानोरा

अनुसूचित जातींसाठी महिला सोडत जाहीर

बोधनी रेल्वे

नीलडोह

गोंडपिंपरी

अहेरी

बेसापिंपळा

कोरची

ढाणकी

धानोरा

बहादूरा

अनुसूचित जातींसाठी महिला सोडत जाहीर

बोधनी रेल्वे

नीलडोह

गोंडपिंपरी

अहेरी

बेसापिंपळा

कोरची

ढाणकी

धानोरा

बहादूरा

नगरपंचाईत अनुसूचित जमातींसाठी महिलांसाठी जागा जाहीर

भिवापूर

अर्जुनी(मोरगाव)

देवळा

समुद्रपूर

सिरोंचा

हिंगणा

पाली

नगरपंचायत मागास प्रवर्गाकरिता (ओबीसी)जागा जाहीर

पारनेर

तळा

घनसावंगी

भामरागड

मंचर

पाटोदा

खानापूर

माढा

पोभुर्णा

माहूर

वाडवणी

पोलादपूर

आटपाडी

खालापूर

मालेगाव जहांगीर

शिरूर अनंतपाळ

पालम

कळवण

मंठा

सावली

कोंढाळी

मानोरा

मारेगाव

माळशिरस

आष्टी(वर्षा)

एटापल्ली

झरी- जामणी

तलासरी

जाफ्राबाद

चाकूर

तीर्थपुरी

कणकवली

शिरूर कासार

आष्टी(बीड)

विक्रमगड

अकोले

जिवती

मोखाडा

कर्जत अहिल्यानगर

सुकाना.

Saturday, October 4, 2025

बीड जिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांत जन्मले ४२ जुळे !


बीड (प्रतिनिधी): पूर्वी क्वचितच दिसणाऱ्या जुळ्या आणि तिळ्या मुलांचे जन्म आता वाढले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या या बालकांच्या संख्येवरून याची कल्पना येते. कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान आणि अनुवांशिकता या प्रमुख वैद्यकीय कारणांमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही वाढती आकडेवारी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे.

जिल्ह्यात नऊ महिन्यांत ४२ जुळ्यांचा जन्म झाला आहे. यातील काहीचे सिझेरियन झाले आहे. तर काही प्रसूती सामान्य पद्धतीने झाल्या आहेत.

जुळे-तिळे जन्माची कारणे काय?-

 अनुवांशिकता : कुटुंबात (आई किंवा वडील) जुळे किंवा तिळे होण्याचा इतिहास असल्यास, हे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढते.- कृत्रिम गर्भधारणेमुळे प्रमाण वाढले: टेस्ट ट्यूब बेबी किंवा इतर औषधांमुळे गर्भाशयात एकापेक्षा जास्त भ्रूण वाढतात, ज्यामुळे जुळे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.- आईचे वय: तज्ज्ञांनुसार, ज्या महिलांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यामध्ये जुळी मुले होण्याची शक्यता किंचित जास्त असते.

प्रसूतीनंतर बाळांची काळजी.

जुळी मुले सहसा वेळेआधी जन्माला येतात. त्यांना संसर्गापासून दूर ठेवणे आणि योग्य स्तनपान देणे महत्त्वाचे आहे. त्यांना पुरेसा उबदारपणा आणि पोषण मिळेल याची काळजी घ्यावी लागते.

विभाग पूर्णपणे सज्ज.

गेल्या काही वर्षांत जुळे आणि तिळे जन्मण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रसूतींसाठी आमचा नवजात शिशू अतिदक्षता विभाग पूर्णपणे सज्ज आहे. जुळ्या बालकांच्या प्रसूतीदरम्यान आणि नंतर आई आणि बाळांची काळजी घेण्यासाठी आम्ही विशेष वैद्यकीय पथकामार्फत सेवा देतो.- डॉ.एल.आर.तांदळे, निवासी वैद्यकीय अधिकारी बीड

पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या कडून मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीची चौकशीचा आढावा.


बीड (प्रतिनिधी) शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणात तीन आरोपी अटक झाले असून शिंदे गटाचा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिराळे अजूनही मोकाटच आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी शुक्रवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेत बसून यशच्या मित्र आणि मैत्रिणींची कसून चौकशी केली. त्या रात्री काय घडले? आणि नेमके कारण काय? याची माहिती घेण्यात आली.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून खुनांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा कसलाही धाक नसल्याचा आरोप केला जात आहे. अशातच बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात यश ढाका याचा भर रस्त्यावर खून करण्यात आला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक आक्रमक झाले. बाबुराव पोटभरे, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, सुजात आंबेडकर आदींनी यावर आवाज उठविला. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनाच एसआयटी (SIT) आणि बदलीची मागणी करण्याचा इशारा दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर देवेंद्र ढाका आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एसपींची भेट घेत सर्व आरोपींना अटक करून कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

त्या’ मुलीचीही केली चौकशी.

यश ढाका याचा खून मुलीला का बोलतो या कारणावरून झाल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणातील मुलीचीही चौकशी करण्यात आली. सोबतच त्याचे मित्र आणि व्हायरल व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आदींची उपस्थिती होती.

ढाका कुटुंबीयांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट.

मोकाट असलेल्या दोन आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी ढाका कुटुंबीयांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली. ॲड. आंबेडकर यांनी तत्काळ वकिलांशी चर्चा केली, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, अमरसिंग ढाका, डॉ. नितीन सोनवणे, ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम ऊर्फ गोटू वीर, लखन जोगदंड आदी उपस्थित होते.

प्रियकर पोलीस उपनिरीक्षक सोबत पत्नीला कारमध्ये रंगेहाथ पकडल.पतीने पोलिस अधिकारीच बदडला.


बीड (प्रतिनिधी) : बीडमध्ये असताना एका विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर धाराशिवला बदली झाली. पिस्तूलचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यानंतर महिन्यापासून त्याच पीडितेवर पुन्हा प्रेम जडले. दोघेजण कारमधून फिरताना पतीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर भर रस्त्यावर प्रियकर असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे याला कपडे फाटेपर्यंत बदडले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी २ वाजता बीड शहरातील बसस्थानकासमोर घडला. अजब प्रेमाच्या या गजब कहाणीची जोरदार चर्चा सुरू आहे.

रवींद्र शिंदे हे पोलिस उपनिरीक्षक म्हणून २०१३ साली बीड पोलिस दलात भरती झाले. पीडिता आणि शिंदे हे शेजारीच राहत असल्याने ओळख झाली. नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केला. बीडहून शिंदे यांची बदली धाराशिवला झाली. परंतु त्याने त्रास देणे सोडले नाही. पिस्तूलचा धाक दाखवून त्याने जून आणि जुलै २०२५ मध्ये पीडितेवर घरात घुसून अत्याचार केला. तसेच तिला मारहाणही केली. यात पीडिता गर्भवतीही राहिल्याची माहिती आहे. याप्रकरणी जुलै महिन्याच्या अखेरीस शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात शिंदेविरोधात अत्याचारासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरारच आहे. शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी कोणतेही प्रयत्न न करता त्याला अभय दिल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला.

शुक्रवारी नेमके काय घडले?

पीडिता आणि रवींद्र शिंदे हे कारमधून (एमएच २३ बीसी ३४०२) बीड शहरातील भाग्य नगर भागात होते. पीडितेच्या पतीने पाहताच पाठलाग केला. तुळजाई चौक, नगर नाका, बसस्थानक मार्गे बाहेर जाण्यापूर्वीच पतीने दुचाकी आडवी लावून शिंदेला खाली खेचले. त्याला कपडे फाटेपर्यंत बदडले. पीडिताही तोंड बांधून तेव्हा कारमध्येच बसलेली होती. तसेच शिंदेही तोंड बांधून होता. त्यानंतर पीडितेच्या पतीने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत शिंदेविरोधात तक्रार दिली.

फरार; तरीही पोलिसांसमोरून पळाला.

शिंदे हा अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार आहे. असे असतानाही तो बीडमध्ये येऊन पीडितेला घेऊन फिरत होता. शुक्रवारी दुपारीही पोलिसांनी हा वाद मिटवला. पीडितेसह पतीला पकडले. परंतु आराेपी असलेल्या एपीआय शिंदेला अभय दिले. त्यामुळे त्याने तेथून धूम ठोकली. शिंदे हा आरोपी आहे, हे माहीतच नाही, असा खुलासा पोलिसांनी केला. तर शिवाजीनगर पोलिसांनी यावर तोंडावर बोट ठेवले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पीडिता तीन दिवसांपासून गायब.

पीडिता ही तीन दिवसांपासून घरी आली नव्हती. त्यामुळे पीडितेच्या पतीला संशय आला. शुक्रवारी दुपारी तो खरा ठरला. त्याने पीडिता आणि एपीआय शिंदे यांना कारमध्ये रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेले. पीडितेने शिंदेविरोधात तक्रार देण्याऐवजी पतीवरच आरोप केले. परंतु पोलिसांना सर्व माहिती असल्याने त्यांनी तिला शांत केले. त्यानंतर तिच्या पतीच्या तक्रारीवरून एपीआय शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला.

शिंदे बीडमध्ये येतो, तरी अटक का नाही?'

पाहिजे', 'फरारी' आरोपी बीड शहरात बिनधास्त फिरत असतानाही पोलिस त्याला पकडत नाहीत, असे आरोप केले जात आहेत. त्यातच शुक्रवारी घडलेल्या घटनेने याला आणखी दुजोरा मिळाला. पोलिस अधिकारी शिंदे हा आरोपी असतानाही शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अगोदरच खून, जीवे मारण्याच्या प्रयत्न अशा गंभीर घटना राजरोस घडत आहेत. त्यात गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अभय दिले जात असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Friday, October 3, 2025

बीड पोलीसांचा आदर्श उपक्रम पूरग्रस्तां साठी केला मदतीचा हात पुढे.

बीड (प्रतिनिधी) अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच स्वप्न धुळीला मिळालं. जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आलेले असताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार रुपये दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पोलीस यंत्रणेने देखील सहा लाख 39 हजार रुपयाचा निधी जमा करत खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी सध्याची परिस्थिती पाहता देशाचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेतून 50 हजारांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली होती.यानंतर इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे अनुकरण करत अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.त्यामुळे बीड पोलिसांकडून मदतीचा ओघ वाढत तब्बल 6 लाख 39 हजारांची मदत पुरग्रस्तांसाठी जमली होती.बीड पोलिसांनी खाकीतून दाखविलेले माणुसकीचे दर्शन सर्वानसाठी आदार्श ठरले.

पती-पत्नीत कौटुंबिक वाद.चार महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये टाकून वडिलांची आत्महत्या.



गेवराई (प्रतिनिधी) आपल्या चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरल मध्ये टाकून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तलवाडा येथील तहत रामनगर येथे घडली आहे.
अमोल हौसराव सोनवणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने चार महिन्यांच्या बाळाला देखील बॅरलमध्ये टाकून जीवे मारले.दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तलवाडा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वीच दोघा पती-पत्नीत कौटुंबिक वाद झाला होता. यातूनच अमोल सोनवणे याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत

बीड जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी!प्रकरण मॅनेज होणार का तपासणी योग्य पद्धतीने होणार?


बीड (प्रतिनिधी) राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्ततुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचारी aanis शिक्षक यांच्या प्रमाणपत्राची तपासणी बुधवारी 8 आक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हापरिषदेने याबाबत आदेश काढले आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षक वर्गाने लाभ मिळवले आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी याबाबत झाडाझडती सुरु केली आहेराज्यातील सर्वच जिल्ह्यात या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पदोन्नती आणि इतर लाभ घेण्यासाठी या प्रमाणपत्राचा आधार घेतल्याच्या तक्रारी आहेत.

यापूर्वी तत्कालीन सिइओ अजित पवार यांच्या काळात देखील प्रमाणपत्र तपासणी झाली होती. मात्र अनेकांना मुंबई येथे जाऊन जे जे रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले होतेपरंतु ते प्रकरण तेव्हा मॅनेज झाले, त्यामुळे यावेळी तरी तपासणी योग्य पद्धतीने होणार का अशी चर्चा आहे.विशेष करून आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यामध्ये या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा सुळसुळाट झालेला आहे. याबाबत जिल्हा परिषदेने शुक्रवारी एका आदेशाद्वारे 8 आक्टोबर रोजी सगळ्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.