धर्मापुरी ( प्रतिनिधी) येथील कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास नुकताच गेवराई येथे पार पडलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हा स्तरीय युवक महोत्सवात सर्व तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
अधिक माहिती अशी की नुकताच दि ११ आणि १२ सप्टें २५ रोजी गेवराई येथील र भ अटृल महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगरचा बीड जिल्हा स्तरीय युवक महोत्सव पार पडला. यात येथील कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान ,कु मोहिनी सुनील कुलकर्णी ,कला तृतीय या विद्यार्थीनीने सुगम संगीत विभागात सर्व तृतीय पारितोषिक पटकावले आहे.तीच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ होळंबे टी एल, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा कातकडे के एस,प्रा डॉ रमाकांत गजलवार,प्रा डॉ सौ शिंदे एस वाय,प्रा जंगीटवार व्ही आर आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी अभिनंदन करुन मोहिनीस शुभेच्छा दिल्या आहेत.लवकरच मोहिनीचा एक छोटे खानी सत्कार करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment