Tuesday, August 12, 2025

दैनिक सोमेश्वर साथी चे संपादक बालासाहेब फड " वंजारी समाजरत्न " पुरस्कार २०२५ ने सन्मानित .

 *नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न* 

परळी (प्रतिनिधी)वंजारी समाजाने संघटित होऊन समाजासाठी कार्य करावे आयोजक संकेत तुकाराम सानप व बाळासाहेब घुगे
यावेळी मा.आमदार. गोविंदराव केंद्रे साहेब राज्यमंत्री दर्जा यांनी समाजाला दोन. एकर  विका पण मुलं शिकवा
हा मुलमंत्र दिला   आयोजक संकेत तुकाराम सानप यांचे मन भरून कौतुक केले यानंतर सिंदखेडराजा आमदार मनोज कांयदे साहेब यांनी समाजाला एकजुटीने काम करण्याचे आव्हान केले व आयोजक संकेत तुकाराम सानप यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत समाजासाठी लढत रहाण्याचा मुलमंत्र दिला 
यशस्वी होण्याचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण! समाजाने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज - कोंडाजी मामा आव्हाड

नाशिक/ महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वंजारी समाज विखुरलेला आहे. समाज्याने संघटित होऊन समाजहितासाठी कार्य करत वंजारी समाजाची ओळख केवळ महाराष्ट्रा पुरतीच मर्यादित न राहता सबंध भारतात समाजाचे नाव निघाले पाहिजे असे मत  संकेत सानप व बाळासाहेब घुगे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र संचालित न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था, वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक, वंजारी क्रांती सेना व श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने वंजारी समाजरत्न पुरस्कार २०२५ वितरण प्रसंगी ते बोलत होते. 

वंजारी समाजातील व्यक्ती सरकारी व शासकीय क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे तर काही व्यवसाय - उद्योजक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणारे तसेच आध्यात्मिक, कीर्तनकार, शास्त्री आहेत यांची समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे यासाठी समाज्याने संघटित होऊन कार्य केले करावे असे असे आवाहन यावेळी आयोजक संकेत सानप व बाळासाहेब घुगे यांनी केले. 

यावेळी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सबंध महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाची नाशिक ही एकच संस्था असून या संस्थेचा विस्तार होणे आवश्यक आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये व जिल्ह्यांमध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र निर्माण झाले पाहिजे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा या पुरवल्या तर वंजारी समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळून यशस्वी होतील. यासाठी समाजातील व्यक्तीने पुढाकार घेऊन शिक्षणासाठी समाजात क्रांती घडवावी आजच्या या आधुनिक काळा टिकायचे असेल तर शिक्षण हे एकमेव माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर  नौसेना अधिकारी अनिल गर्जे साहेब कोंडाजी मामा आव्हाड, भाजपा शहर अध्यक्ष सुनिल केदार, नाना शिलेदार, मोहन घुगे, बबन खाडे, जगन आप्पा कुटे, बुधजी पानसरे, ह भ प सोपान महाराज शास्त्री, माधुरी ताई पालवे, डॉ मंजुषा दराडे, विमल आव्हाड, यमुना ताई घुगे, संकेत तुकाराम सानप, रंगनाथ दरगुडे, रोहिदास आव्हाड, डॉ उल्हास कुटे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 

कार्यक्रमाचे आयोजन  संकेत सानप सर व दिव्यांग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी केले होते. सूत्रसंचालन नंदू सानप सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बी के नागरे सर यांनी मानले 

*वंजारी समाजरत्न पुरस्कार -  २०२५ यांना यांना प्रदान करण्यात आला* यावेळी  आयोजक  संकेत तुकाराम सानप, समाजसेवक व  बाळासाहेब घुगे ,  बी. के. नागरे सर, कैलास कराड  सुरेश सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच वंजारी समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कार्थींचे नावे 
 ह भ प अँड युवा किर्तनकार अस्मिताताई सांगळे सत्येगावकर ,विठ्ठल कांगणे सर आदर्श शिक्षक,रामदास कचरू  आव्हाड 
मा.उपायुक्त वित्त व अर्थ बृहन्मुंबई महानगरपालिका ,सागर सानप सर आदर्श शिक्षक व (सागर क्लासेस),किरण नागरे पोलिस विभाग प्रशासकीय,आश्विनी तिडके क्राईम ब्रांच पुणे ,अनिकेत मुंडे पोलिस प्रशासक ,कांतीलाल सुदामराव बोडके (आदर्श सरपंच - दारणा सांगवी) , वसंतराव मुरलीधर धात्रक (आदर्श शिक्षक) , प्रा.सदाशिवराव राजाराम खाडे सर  सामाजिक कार्य , सातारा लक्ष्मण एकनाथ गोमासे (बांधकाम व्यावसायिक),  संजय नागरे (आदर्श शिक्षक) व उल्लेखनीय कामगिरी , शिवाजी नबाजी ऊगले (ट्रान्सपोर्ट व्यवसायिक) , बाळनाथ देवराम घुगे (आदर्श शिक्षक) , विठोबा राजे फडे (राजकीय) , सचिन कोंडाजी शेळके (प्रशासन), काशिनाथ बाबुराव मुंढे (आदर्श मुख्याध्यापक), जगन आप्पा कुंटे (समाजसेवक), डॉ. आनंदा सानप (प्रसिध्द डॉक्टर) , ॲड. रमेश काळे दापुर , भास्कर आव्हाड (कुषी अधिकारी- निफाड) , दता बबनराव सोनवणे (आदर्श सरपंच गोंदे),अजय विष्णू आघाव राजकीय व सामाजिक क्षेत्रात ) ,गोरख कारभारी घुगे (देशसेवा) , संदिप बबन नांगरे (राजकीय),गणपतराव हाडपे (जेष्ठ समाजसेवक) , आदिती प्रकाश गायकवाड (आदर्श समाजसेविका) , डॉ सुनील सांगळे पंचवटी वैद्यकीय सेवा , योगेश भास्करराव कातकाडे समाजसेवक व कर सल्लागार ,प्रकाश सानप (युवा उद्योजक),मारुती मुंडे दिव्यांग सेवक ,
मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर तसेच सिनेट सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विजय सोनवणे, ,तुषार फड युवा उद्योजक व सामाजिक, नारायण काकड - सामाजिक सेवा, माणिक घुगे भगुर लाहुरी

 पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श सन्मानार्थी

बालासाहेब फड (दैनिक सोमेश्वर साथी - परळी वैजनाथ) 
नितीन ढाकणे ( दैनिक अतुल्य महाराष्ट्र परळी वैजनाथ)
नरहरी उंबरे - दैनिक पुण्यनगरी ( मनमाड) 
विलास ढाकणे - दैनिक देशदूत ( दिंडोरी)
रामनाथ ढाकणे - TV9 मराठी (जालना)  
संभाजी मुंडे - TV9 मराठी ( परळी )
 श्री.अरुण भगवान खरमाटे सर 
   दैनिक  बाळकडु सातारा 
बुधवंत नवभारत न्यूज 
 ज्ञानेश्वर आंधळे - ९न्युज महाराष्ट्र ( नाशिक)

आदींना वंजारी समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे 
सदर पुरस्कार सोहळ्यास सर्व वंजारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संकेत तुकाराम सानप  समाजसेवक बाळासाहेब घुगे कैलास कराड बी के नागरे सर मारुती इलग  व टीम ने कार्यक्रम भैव्य दिव्य नियोजन बद्ध कार्यक्रम संपन्न झाला .

No comments:

Post a Comment