Wednesday, July 9, 2025

बजरंगबली वेताळ मंदिरात गुरूपौर्णिमा सोहळा उत्साहात साजरा होणार. गुरू पूजनाचा विशेष सोहळा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बजरंगबली वेताळ मंदिरात गुरूवार, दि. 10 जुलै रोजी पारंपरिक भक्तिभावाने गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भाविक भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संयोजक प.पू. विलासानंद महाराज यांनी या पवित्र उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सर्व भाविकांना केले आहे.
उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गुरूपूजनाचा विशेष सोहळा असून, त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती आणि 1 वाजता सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांचे प्रतीक असलेल्या या दिवशी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण एकत्र जमणार आहेत.
या शुभ दिवशी गुरूंच्या मार्गदर्शनाची प्रेरणा घेऊन, अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आत्मसात करण्याचा संदेश यानिमित्ताने दिला जाणार आहे. सर्व भक्तांनी आपल्या कुटुंबासह या दिव्य कार्यक्रमास उपस्थित राहून पुण्यसंचय करावा, असे आवाहन संयोजक प.पू. विलासानंद महाराज यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment