लातूर (प्रतिनिधी) मागील आठवडाभरा पासून सुरू असलेल्या परिचारिकांच्या मागण्याबाबत राज्याचे वैद्यकिय मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर मागण्या मान्य केल्याचे इतिवृंत लिखीत स्वरूपात मिळाल्यामुळे वार 18 जुलैपासून सुरू असलेला संप शुक्रवार २५ पासून स्थगित करण्यात आला आहे.
परिचारिकाऎवजी शुश्रुषा अधिकारी पदनाम बदल मंजूर
सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या, पदनाम बदल, निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन केले असून राज्य शासनाने यांची दखल न घेतल्यामुळे दिनांक १८ जुलैपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघाच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले,संप काळात राज्यस्तरीय पदाधिका-यांनी परिचारिकांच्या मागण्या ठाम पणे लावून धरल्यामुळे शासनस्तरावर मागण्याचे मान्य करण्याचे शासनाने मंजुर केले.
या संपात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूर येथे राज्यखजिनदार राम सुर्यवंशी, राज्यसंघटक पांडुरंग गव्हाणे, कोर कमिटी सदस्य योगेश वाघ,शिला कांबळे, सुरेखा लहाणे,लातुर शाखेच्या अध्यक्षा छाया चव्हाण , उपाध्यक्ष संजीव लहाणे, रेणुका पाटील, सचिव भाग्येश्री जोगदंड, सहसचिव भगवान केंद्रे, खजिनदार बालीका सावंत, सहखजिनदार दिपक शिंदे नर्सिग महाविद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी बेले,अंजना गिरी,सुनिता गिरी, विजय जाधव ,स्त्री रुग्णालयातील आशा कुरुळेकर, शिला गोचडे, बाभळगाव नर्सिग काॅलेजचे सर्व कर्मचारी तसेच संघटना सदस्य शोभा जाधव, किरण निकम, मिना दैवज्ञ, निर्मला गाडेकर, भागवत मुंडे, धनश्री गोसावी, सतिश करे, आनंद पवार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment