Friday, July 11, 2025

सद्गुरू श्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने.दिव्य ज्योती जागृती संस्थान च्या वतीने भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरात आध्यात्मिकता व संस्कारांचे दीप प्रज्वलित करणाऱ्या ‘दिव्य ज्योती जागृती संस्थान’च्या वतीने रविवार, दिनांक १३ जुलै रोजी हालगे गार्डन येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
सद्गुरु परम पूज्य श्री आशुतोषजी महाराज यांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संपन्न होणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात सकाळी १० वाजता सद्गुरु पूजन व आरतीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता भजन, कीर्तन व सत्संग अशा अध्यात्मिक कार्यक्रम होणार असून भक्तिरसात न्हालेलं वातावरण अनुभवण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.
कार्यक्रमाची सांगता  महाप्रसाद वितरणाने होणार असून, परळी शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुतत्त्वाची महती अनुभवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हा महोत्सव भक्तिभावाने भारलेला असून, परळीकरांसाठी हा एक आध्यात्मिक सोहळा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment