Monday, June 16, 2025

जि.प. प्रा. शाळा संगम येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांनी ग्रंथालया तील पुस्तके वाचावीत, एक झाड आईच्या नावे लावा"- नायब तहसीलदार परवीन पठाण

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार मा. परवीन पठाण मॅडम यांनी शाळेस सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक श्री अशोक नावंदे, तलाठी पंडित साहेब, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मा. पठाण मॅडम यांनी पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, शालेय गणवेश व बूट-सॉक्सचे वाटप करण्यात आले.
शाळेने प्रभातफेरी, वर्गखोल्या व परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी, पोषण आहार आदी उपक्रम प्रभावीपणे राबवले. याबद्दल नायब तहसीलदार पठाण मॅडम यांनी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे कौतुक केले.
तसेच शालेय ग्रंथालयासाठी दोन पुस्तके भेट दिली व वृक्षारोपणासाठी एक रोप प्रदान करत विद्यार्थ्यांना आवाहन केले की, "ग्रंथालयातील पुस्तके नियमित वाचा आणि एक झाड आईच्या नावाने लावावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात शा.व्य. समितीचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला, तर मुख्याध्यापक अशोक नावंदे सर यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सर्वश्री सुभाष कोंकेवाड सर, महादेव गित्ते सर, कल्पना बडे मॅडम, बबिता शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment