परळी वैजनाथ (प्रतिनिधी)विसाव्या शतकातील महान संत विभुती सद्गुरू संत श्री ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या पवित्र पावन दरबारा मध्ये शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी संध्याकाळी सात ते नऊ या वेळे मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
फाल्गुन अमावस्या निमित्त वारकरी संप्रदाय कीर्तन परंपरेतील युवा कीर्तनकार श्री ह भ प प्रकाश महाराज फड श्री क्षेत्र आळंदी देवाची यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी हरिनाम श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन माऊली संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक शांती ब्रह्म श्री हरी भक्त परायण महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment