बीड (प्रतिनिधी)| गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे. येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तर बीडमधील अनेक गुन्हे समोर आले आहेत. बंदुकीचे परवाने, खंडणी प्रकरण असे अनेक धक्कादायक प्रकार या दिवसांत उघड झाले आहेत. बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय? येथे कायदा-व्यवस्था याचा धाक आहे की नाही?, असे सवाल उपस्थित होत आहेत. अशात बीडमधून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे.
एसपींच्या कार्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याचा गळफास
इंगळे यांनी गळफास घेऊन आपले आयुष्य का संपवले?, त्यांच्या आत्महत्येमागं नेमकं कारण काय? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित होत आहे. मात्र, यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोलीस आता घटनास्थळाचा पंचनामा करत आहे.
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने बीड प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आत्महत्या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध होता का?, याचा तपासही पोलीस करत आहेत. पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
सरपंच हत्येशी संबंध तर नाही?
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा अटकेत असून त्याचे येथील काही पोलिसांचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलीस तपासावर देखील संशय व्यक्त केला जातोय. अशात ही धक्कादायक घटना समोर आल्याने बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment