केज (प्रतिनिधी) अवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड ला केज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी ने वाढीव दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आरोपीच्या वकिलाने तपास पूर्ण झाल्याने वाढीव कोठडीची गरज नाही अशी माहिती दिली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.
वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी कोर्टाला अवगत केलं. वाल्मिकची मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याची माहिती मिळत असून ही संपत्ती भारताबाहेरही असू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे त्याला खंडणीच्या प्रकरणात आणखी १० दिवस सीआयडी कोठडी मागण्यात आलेली आहसरकारी वकील शिंदे हे सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. तर सिद्धेश्वर ठोंबरे हे वाल्मिक कराडची बाजू केज कोर्टामध्ये मांडत आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने दहा दिवसांची कोठडी मागितल्याचं मीडिया रिपोर्टनुसार कळतंय. यापूर्वी वाल्मिकला १४ दिवसांची कोठडी मिळाली होती
दरम्यान, १२ डिसेंबर २०२४ पासून फरार असेलला वाल्मिक ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला. त्यानंतर त्याला फरार होण्यासाठी मदत करण्यांची चौकशी करण्यीच मागणी होत आहे. एवढंच नाही तर खुद्द धनंजय मुंडेंच्या बंगल्या पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर वाल्मिक फरार झाला, आसा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
खंडणीच्या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. ते नमुने आवादा कंपनीचे सुपरवायझर शिंदे यांच्या आवाजाशी मिळतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. कारण शिंदेंच्या मोबाईलमधून मोबाईल कॉल डेटा सीआयडीला मिळालेला आहे. मात्र विष्णू चाटेचा मोबाईल अखेर सीआयडीला मिळालाच नाही. शेवटी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली.
No comments:
Post a Comment