*साखरखेर्डा आणि परळी परिसरात आनंदोत्सव; सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या प्रयत्नांना मिळाले यश
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बुलडाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आता साखरखेर्डा येथील पूजनीय श्री जगदगुरू पलसिद्ध महास्वामीजींचे पवित्र नाव देण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण साखरखेर्डा आणि परळी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. वीरशैव लिंगायत समाजाने केंद्र सरकार आणि संबंधित लोकप्रतिनिधींचे आभार मानत या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.
सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराजांचे अथक योगदान
साखरखेर्डा येथील सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराजांनी या ऐतिहासिक निर्णयासाठी निर्णायक भूमिका बजावली. त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील आमदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधला आणि हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रखर पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज साखरखेर्ड्याला ही ऐतिहासिक भेट मिळाली आहे.
वीरशैव लिंगायत समाजाचा सन्मान आणि आनंद
या नावकरणामुळे श्री जगदगुरू पलसिद्ध महास्वामीजींच्या महान कार्याचा गौरव झाला असून, लिंगायत समाजाचा धार्मिक आणि सांस्कृतिक सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. परळीतील वीरशैव लिंगायत समाजाने या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आणि मंत्री जाधव यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
परस्पर सहकार्याने मिळवलेले ऐतिहासिक यश
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी या नावकरणासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे हा निर्णय संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यासाठी आभिमानाचा क्षण ठरला आहे.
संस्थेला नवी ओळख, प्रगतीचा नवा अध्याय
जगदगुरू पलसिद्ध महास्वामीजींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आता एक नवा गौरव प्राप्त झाला आहे. यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, तर साखरखेर्डा परिसराच्या विकासाला नवे आयाम प्राप्त होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
“हा केवळ साखरखेर्ड्याचाच नव्हे, तर संपूर्ण बुलढाना जिल्ह्याचा व परळीकरांसाठी ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आहे. हा निर्णय भावी पिढ्यांसाठी आदर्श ठरेल,” अशा शब्दांत समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment