लातूर : (प्रतिनिधी) प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही "डॉ. बाबसाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी लातूर च्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आयोजन केले असून हे 17 वे वर्ष आहे. मराठी भाषेतील, कथा, कविता, कादंबरी, संपादीत ग्रंथ, बालसाहित्य, आत्मचरित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरील ग्रंथ पाठवून सहकार्य करावे. या पुरस्कार योजनेसाठी आपले साहित्य 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशीत झालेले असावे. आपले साहित्य दोन प्रतीत, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, संक्षिप्त परिचयासह दि.28/02/2025 पर्यंत अकॅदमीचे सचिव प्रकाश घादगिने, राजलक्ष्मी निवारा, गगन विहार जवळ, विशाल नगर लातूर - 413512. मो. नं. 9421695454 पाठवावे मुदतीनंतर व अपूर्ण असलेले बायोडाटा, पत्ता, फोटो नसलेल्या साहित्यांचा विचार केला जाणार नाही.
स्पर्धेतील विजेत्यांना कथा, कविता, कादंबरी, संपादीत ग्रंथ, बालसाहित्य, आत्मचरित्र साहित्य प्रत्येक विभागावार प्रथम 1500/-, व्दितीय 1000/-, तृतीय 750/- रुपये रोख रक्कम, शाल श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्हे देऊन एप्रिल 2025 च्या पहिल्या आठवडयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहीत्य अकॅदमीचे पहिले साहित्य संमेलनात गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन व्यक्तीचा गौरवही करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत जास्तीत जास्त साहित्यिकानी सहभाग नोंदवावा असे आवाहन अकॅदमीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. श्रीधर गायकवाड, सचिव प्रकाश घादगिने, प्रा. डॉ. माधव गादेकर, आर. पी. गायकवाड, गोंडराज रावन आत्राम, अर्जुन कांबळे, शिवाजी गायकवाड, डॉ. संजय जमदाडे, ॲड अंगद गायकवाड, सौ. कुसुमताई बोडके, सौ. वंदना गादेकर आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी अकादमीचे सचिव प्रकाश घादगिने 9421695454 यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment