मुंबई (प्रतिनिधी) देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर संताप व्यक्त केला आहे.
ॲड.आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी पहिल्यांदा स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. त्यांना देशमुख हत्येप्रकरणी काही सापडले नाही. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली, त्यांना काही सापडले नाही. त्यानंतर CID ने चौकशी केली, त्यांनाही काही सापडले नाही.
आता चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे. पुढे काय करणार, तर ही केस CBI ला देणार असेही ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
ज्यांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही, याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा, असा सल्लाही आंबेडकरांनी फडणवीस यांना दिला आहे.
No comments:
Post a Comment