Friday, January 3, 2025

महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे आदेश परळी औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रातील 92 कर्मचार्याच्या बदल्या.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रातील कर्मचार्याच्या बदल्या ची प्रक्रिया सुरू केले  13 ते 26 डिसेंबर या कालावधीत परळी औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रातील तंत्रज्ञा 2 (मंडळस्तरीय) 92  कर्मचार्याच्या बदल्या चे आदेश महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे अभियांता यांनी काढले आहेत विशेष म्हणजे या सर्व बदल्या भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथे  करण्यात आलेल्या आहेत. या बदल्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाल्या चे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. या बदल्या मध्ये सगळ्या नियमाची पायमल्ली करून बदल्या केल्या चे दिसून येत आहे. बदल्या करते वेळी कुठल्याही सेवा जेष्ठतेचा विचार नाही तसेच यामध्ये असेही अनुकंपा कर्मचारी आहेत त्यांनी बाहेर भुसावळ व इतर ठिकाणी सेवा करुन परत बदलीवर परळी औष्णिक वीजनिर्मिती येथे आले आहेत असे असताना परत बदली करणे म्हणजे यामध्ये आर्थिक व्यवहार होत आहे का काय किंवा जाणून बुजून ठराविक लोकांना नियमबाह्य बदल्या करून त्रासदायक करत आहेत का अशी शंका वाटते असे कर्मचारी वर्गातुन बोलले जात आहे.
 परळी औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जन आहेत  यातील बहुतांश कर्मचारी परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरातील गावातील आहेत.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात परळी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाच्या राखेचा प्रश्न चव्हाट्यावर आल्यानंतर आता परळी औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्राच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले.

No comments:

Post a Comment