Monday, November 18, 2024

ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या अर्चना कुटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलााठेवीदाराचे पैसे हडप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.


पैठण (प्रतिनिधी) पैठणसह मराठवाड्यातील ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह सर्व संचालकावर ठेवीदाराचे पैसे हडप केल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आत्तापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. हा तपास छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

यामध्ये संस्थापक अध्यक्ष यांची पत्नी अर्चना कुटे यांचा देखील समावेश असल्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन हा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील बांगर यांनी कामकाज पाहिले. तसेच तक्रारदाराच्या वतीने अॅड. प्रवीण बडे यांनी कामकाज पाहिले आहे.

No comments:

Post a Comment