Thursday, October 24, 2024

लग्नाचे अमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार. तीन जणांवर गुन्हा दाखल.

गंगाखेड (प्रतिनिधी)  : लग्नाचे अमिष दाखवत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच आरोपींनी पिडीतेला घरी बोलावुन जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना गंगाखेड शहरातील परभणी रोडवर एका विटभट्टीजवळ घडली. या प्रकरणी २२ ऑक्टोबरला गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात घुसून महिलेचा विनयभंग
पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२३ या दरम्यान आरोपींनी मुलीला लग्नाचे अमिष दाखवुन तिच्यावर अत्याचार केला. इतर आरोपींनी पिडीतेला घरी बोलावुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पिडीतेने गंगाखेड पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. विजय लटपटे, लक्ष्मीबाई लटपटे, कावेरी लटपटे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे करत आहेत.

घरात घुसून महिलेचा विनयभंग. 

गंगाखेड लाईट नसल्याने नवरा, मुलाबाळासह घराचा दरवाजा उघडा ठेवुन झोपलेल्या एका महिलेच्या घरात घुसून वाईट हेतुने तिचा हात धरत विनयभंग करण्यात आला. ही घटना गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा येथे २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी बिभीशन गायकवाड याच्यावर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. डोईफोडे करत आहेत

No comments:

Post a Comment