Wednesday, September 25, 2024

शेकडो कोटी रुपयांचा अपहार. जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट चे अध्यक्ष बबन शिंदे वृंदावन येथून अटक.


बीड (प्रतिनिधी) शेकडो कोटी रुपयांचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट चा अध्यक्ष बबन शिंदे याला वृंदावन येथून जेरबंद केले आहे. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता.

बीड सह जिल्ह्यात पाच ठिकाणी शाखांचे जाळे उभारून शिंदे याने तीनशे कोटिपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला.

या प्रकरणात बीड सह पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. बीड पोलिसांनी त्याला वृंदावन येथून जेरबंद केले आहे.


No comments:

Post a Comment