Friday, September 27, 2024

राज्यातील गृह विभागाकडून भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश.


मुंबई (प्रतिनिधी)  राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाकडून गुरुवारी (ता. २६) काढण्यात आले. त्यात पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी, तर सीआयडीचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

अन्य पोलिस अधिकाऱ्यांची नावे, सध्याचे आणि कंसात बदलीचे ठिकाण 

शारदा राऊत- विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा (सहआयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई), अभयसिंह देशमुख- पोलिस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली), गोकूळ राज जी.- समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, नवी मुंबई (अतिरिक्त अधीक्षक, वाशीम), सिंगा रेड्डी- अतिरिक्त अधीक्षक, गडचिरोली (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, नवी मुंबई), श्रेणिक लोढा- राज्यपाल यांचे परिसहाय्यक (अतिरिक्त अधीक्षक, गडचिरोली).

No comments:

Post a Comment