Friday, September 6, 2024

बदली होऊन देखील एलसीबीचा कारभार करणारे साहेबामुळे पोलीस दलाच्या शिस्तीला खिळ.


­बीड (प्रतिनिधी) बदली होऊन देखील एलसीबीचा कारभार हाकणारा गणेश हंगे नावाचा कर्मचारी एलसीबी पीआयचा जावई असल्यागत नसलेल्या जहागिरीवर कुंडली मारून बसला आहे. यामुळे पोलीस दलाच्या शिस्तीला खिळ बसू लागली आहे.

‌. गेल्या सात वर्षापासून एकाच ठिकाणी बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्या.मात्र गणेश हंगे नावाचा कर्मचारी याला अपवाद ठरला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला फाट्यावर मारत चक्क अजगरासारखी कुंडली या कर्मचाऱ्याने एलसीबीतच मारली. एनालिसिस (विश्लेषण) शाखेत बदली केली गेली असली तरी कारभार मात्र एलसीबीचा हाकत आहे.वसुली सारखं महत् पुण्याच काम हा कर्मचारी करत असल्याने तो म्हणेल तीच पूर्व दिशा ठरत आहे. “राजाच्या घरी माहंडूळ कारभारी”या म्हणी प्रमाणे एक वेळेला पीआय कर्मचाऱ्यावर रुबाब झाडणार नाही पण या कर्मचाऱ्याचा तोरा वाढल्याने सहकारी कर्मचारी मात्र त्रस्त झाले आहेत. पोलीस अधीक्षकांचे आदेश कसे धाब्यावर बसवायचे यात हा कर्मचारी वाकबगार आहे.शिवाय एलसीबी पीआयकडून पाठराखण देखील केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. “हंगे अन् एस पी चा आदेश उलटा टांगे” असं आता गमतीने म्हटलं जाऊ लागला आहे. हंगेच्या व उस्मान शेख यांच्या थिल्लर पणामूळे पोलीस दलाच्या शिस्तीला खिळ बसत आहे.

No comments:

Post a Comment