बेलापूर :- (प्रतिनिधी) गौसे आजम सेवाभावी संस्थेने तसेच जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे "जल्सा-ए-सिरतुन नबी" व "वृक्षारोपण" कार्यक्रम आयोजित करण्यात आला....कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज.इमाम सर यांनी केले..कार्यक्रमात नात पठण करण्यात आली.अनेक विद्यार्थी त्यात सहभागी झाले तसेच त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे सन्मान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला..
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक आपल्या भाषणात म्हणाले की मोहम्मद पैगंबर एक थोर समाज सुधारक होते यांनी समाजात असणाऱ्या अनेक रूढी परंपरा स्री भ्रुण हत्या तसेच महिलावर होणारे अत्याचार यावर आळा घातला मोहम्मद पैगंबर यांनी जीवनात सर्वात जास्त शिक्षणाला महत्व दिले गौसे आजम ही सेवाभावी संस्था ही पैगंबरांचे आदेश पालन करून त्याचं पध्दतीने सामाजिक कार्य करत आहे .अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहीले पाहीजे असेही नाईक म्हणाले.. या वेळी आमदार श्री.लहुजी कानडे साहेब, जि.प.सदस्य शरद नवले, कृ.उ.बा.स.उपसभापती अभिषेक खंडागळे,काँ.रा.सरचिटणीस अक्षय पा.नाईक, आदिंनी मनोगत व्यक्त करताना गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या व संस्थापक मुख्तार सय्यद व अध्यक्ष सुलतान शेख यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील समाजकार्याकरीता शुभेच्छा दिल्या या वेळी मान्यवरांच्या हस्ते आपल्या जिल्ह्यात गुणवत्ता यादीत नावलौकिक मिळवणारी फातिमा अजहर सय्यद "खरं तर तिला घडवणारी शाळा व शिक्षकांनी शाळेच्या व्यवस्थापन समितीने आपले लक्ष ज्यांचं भविष्य आपल्या हातामध्ये सोपविलेले आहे. त्या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे कसं घडवता येईल याकडे दिलेला आहे.. याचा अर्थ असा आहे की गुणवत्ता पूर्ण शिक्षण या विद्यार्थ्यांना या शाळेत दिला जातोय या ठिकाणी व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्ग अभिनंदन साठी आणि कौतुकासाठी पात्र आहे.."
त्यावेळी आमदार लहू कानडे साहेब, जि.प.सदस्य श्री.शरद नवले,काँ.ता.अध्यक्ष श्री.अरुण पा.नाईक, कृ.उ.बा.स.उपसभापती श्री.अभिषेक खंडागळे, सरपंच स्वातीताई अमोलिक, उपसरपंच तबस्सुम बागवान, काँ.रा.सरचिटणीस अक्षय पा.नाईक, अजीज शेख, मोहसिन सय्यद,शफीक बागवान, सरफ़राज़ सय्यद,रफीक शाह, मोहसिन शेख ,मुनीरभाई बागवान, शाहनवाज भाई , हाजी इस्माइल,जिना भाई, और अकबर सय्यद, गौसे आजम सेवा भावी संस्था चे संस्थापक मुख़्तार सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव, राजू शेख, तालुका अध्यक्ष सोनू भाई शेख, व सर्व सदस्य हितचिंतक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment