आ.नमिताताई ! अनेक दिवसांचे कुंबेफळ एमआयडीसी चे स्वप्न पूर्ण होणार का ?केज तालुक्यात चर्चा सुरू.
केज (प्रतिनिधी) केज विधानसभा मतदारसंघात असलेल्या केज शहरामध्ये अद्यापपर्यंत अनेकदा एमआयडीसी होणार म्हणून ऐकायला मिळालेले आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात हा मुद्दा दरवेळी पटलावर येतो आणि निवडणुका झाल्या की परत थंडावतो म्हणून एमआयडीसीच्या बाबतीतलं हे पेल्यातलं वादळ किती दिवस गरम राहणार आणि पुन्हा नेमकं कधी थंड होणार यावर मतदारसंघात चवीने चर्चा सुरू असते. केज शहरामध्ये एमआयडीसी व्हावी म्हणून खूप दिवसांनी मागणी आहे परंतु मधल्या काळात केजच्या आमदार झाल्या नंतर देखील हा प्रश्न सुटले ला नाही. या परिक्षेत त्यांनाही पास होता आलेले नाही. आता अंबेजोगाई शहरात राहणाऱ्या आमदार आहेत. सध्या केजच्या एमआयडीसी चार मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पिसेगाव आणि कु़बेफळ या ठिकाणी एमआयडीसी होणार असे अंबेजोगाई च्या आमदार सांगतात परंतु नेमकं निवडणूक सुरू झाल्यावर च का हा विषय व्हावा यामुळे यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. कुंबेफळमधे जर एमआयडीसी झाली तर खूपच फायदेशीर होणार आहे. मोठ्या हायवेवर ही एमआयडीसी होईल आणि या भागातील बेरोजगार तरुणांना उद्योग उभे करता येतील त्यांच्या हाताला काम मिळेल, परंतु नेमकी निवडणुकीत च यावर त्यांनी लक्ष वेधण्याचा केज तालुक्या तील जनते चा प्रयत्न केल्यामुळे हे काम खरंच होणार आहे की हे निवडणुकीचे गाजर आहे असीही चर्चा होत आहे. अंबेजोगाई च्या आमदारांनी जर खरच केजसाठी या ठिकाणी एमआयडीसीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली तर यावेळी होणाऱ्या विधान सभेच्या परीक्षेत देखील त्या च पास होतील.
No comments:
Post a Comment