Thursday, September 19, 2024

बनावट नोटा चलनात प्रकरणी.बीड शहर पोलिसांनी एका आरोपी ताब्यात.पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; 14 ठिकाणी छापेमारी.

बीड (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच राज्य कायद्याचं आहे हे दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी बीड शहर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्याची कारवाई दोन दिवसापूर्वी केली होती. यात आता पोलिसांना पुढील धागेदोरे मिळाले असून बनावट नोटामध्ये मनेश क्षीरसागर,सनी आठवले,महेश आठवलेचा सहभाग आढळून आल्याने या आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवित घराची झाडाझडती घेतली असता आरोपींच्या घरात तलवार,कुकरी,चाकू,खंजीर सापडून आले.तिन्ही आरोपी विरोधात शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून बीड जिल्हयात कायदा आणि सुवस्थेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.अवैध दारू,वाळू माफियांचा बिमोड, गुटखा तस्करीवर निर्बंध लादल्यानंतर शहरातील गुन्हेगार असलेल्यांच्या घरावर १४ जणांच्या टीमने १४ ठिकाणी एकाच वेळी छापे मारले.यात बनावट नोट प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या क्षीरसागर व आठवलेच्या घरात पोलिसांना सशस्त्र साठा मिळून आला होता.दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे,वर्षा व्हगाडे, बाबा राठोड,पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर.इंगळे,श्री.सानप,श्री.जोगदंड,सलमान शेख,रियाज शेख, श्री.शिंगणे,श्री.निकम आणि ९२ पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment