*सामाजिक कार्यकर्ते मनोज संकाये यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर आणि परिसरातील माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच आपल्यावर मनापासून प्रेम केले असून या प्रेमाची शिदोरी घेत आपण कार्यरत आहोत. यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते मनोज संकाये यांनी व्यक्त केला.
मनोज संकाये यांचा वाढदिवस आज शनिवारी परळी शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आज दिवसभर विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त मनोज संकाये यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना मनोज संकाये यांनी सांगितले की, परळी शहर आणि परिसरातील नागरिकांचे आपल्यावर मनापासून प्रेम असून मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांसाठी जे शक्य आहे ते काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आशिर्वाद आणि सहकार्य माझ्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे असून यापुढेही आपल्या सेवेत अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास मनोज संकाये यांनी व्यक्त केल.
आज सकाळपासूनच मनोज संकाये यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मोबाईल फोन, व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मिडीया वर तसेच प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते , पदाधिकारी तसेच वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, व्यापारी व मित्रपरिवार आदींनी श्री मनोज संकाये यांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment