बीड (प्रतिनिधी) काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील नगर नाका ते पालवन चौक असणाऱ्या धानोरा रोडचे रुंदीकरण नूतनीकरण करून रस्त्याचे काम करण्याच्या मागणीसाठी पत्रकार नितेश उपाध्ये यांनी आमरण उपोषण केले होते त्यांना धानोरा रोड परिसरातील विद्यार्थी महिला नागरिक तरुण यांनी मोठा प्रतिसाद देत त्यांच्या उपोषण स्थळी जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता.
आणि रस्त्याच्या मागणीसाठी देखील निवेदने दिले होते याचेच दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या शिष्टमंडळा सोबत बैठक पार पडली यामध्ये धानोरा रोड वरील खड्डे बुजविण्याचे तोंडी आश्वासन दिले होते तसेच नगर परिषदेला सूचना केल्या होत्या परंतु याविषयी कसल्याही प्रकारची कारवाई अथवा रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत आणि उर्वरित दोन दिवसांमध्ये देखील बुजविण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येतात पत्रकार नितेश उपाध्ये यांनी आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
No comments:
Post a Comment