*विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन भाविकांची मोठी उपस्थिती*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पवित्र श्रावणमासानिमित्त श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर यांचे आज सोमवार दिनांक 5 ऑगस्टपासून प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात अनुष्ठान सुरू उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने अनेक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावणमास निमित्त गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज, गिरगांवकर यांचे 5 ते 17 आँगस्ट दरम्यान श्री.शनी मंदीर देवस्थान, वैद्यनाथ मंदीरच्या पायथ्याशी श्रावणमास तपोनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी श्री व सौ.सचिन त्रिंबकअप्पा काटकर यांच्या हस्ते श्रीं ची पुजा व आरती करण्यात आली.
तसेच महाप्रसाद श्री शाहुराव ढोबळे यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचेे स्वागत द्वादश पंचम् ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे द्वादश श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे व पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायण सोहळा, कीर्तन, प्रवचन, वृक्षदान सोहळा, वृक्षारोपण, जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विरशैव लिंगायत समाजाचे समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment