Thursday, August 1, 2024

ष.ब्र.108 श्री.गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या श्रावणमास तपोनुष्ठानाचे आयोजन. तपोनुष्ठान पत्रकाचे डॉ.प्रभाकर कोरे यांच्या हस्ते विमोचन

*माजी खासदार डॉ.प्रभाकर कोरे यांचे वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्यावतीने स्वागत व निमंत्रण. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)द्वादश पंचम ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानिमित्त माजी खासदार तथा कर्नाटक राज्यातील नामांकीत शैक्षणिक संस्था लिंगायत एज्युकेशन सोसायटी,बेळगांव चे चेअरमन डॉ.प्रभाकर कोरे सह परीवार परळी- वैजनाथ येथे गुरूवार दि.1 अॉगस्ट रोजी आले असता त्यांचा वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीच्यावतीने श्री.वैजनाथ देवस्थान कमिटीचे विश्वस्त श्री.विजयकुमार मेनकुदळे व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह समाज बांधव व पदाधिका-यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
   यावेळी ष.ब्र.108 श्री.गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज,गिरगांवकर यांच्या दि.5 अॉगस्ट ते दि.17 अॉगस्ट 2024 दरम्यान श्री.शनी मंदीर देवस्थान,वैद्यनाथ मंदीरच्या पायथ्याशी होणा-या श्रावणमास तपोनुष्ठान पत्रकाचे विमोचन डॉ.प्रभाकर कोरे यांच्या हस्ते करून त्यांना श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्यावतीने निमंत्रित करण्यात आले.
श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद,अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायम सोहळा,कीर्तन,प्रवचन,वृक्षदान सोहळा,वृक्षारोपण,जलपुनर्भरण,आरोग्य तपासणी शिबीर,सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 याप्रसंगी म.बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी कॉलेज अॉफ इंजिनिअरींग,अंबाजोगाई चे प्राचार्य श्री.बाबू खडकभावे सर,संजय मेनकुदळे,रमेशअप्पा सपाटे,सोमनाथअप्पा निलंगे,श्री.गुरूलिंग स्वामी मंदीराचे विश्वस्त अक्षय मेनकुदळे,वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा.महेशश्वर निर्मळे,चंदूअप्पा उदगीरकर,संजय खाकरे,दयानंद चौधरी,चंदूअप्पा हालगे,प्रकाश खोत,सोमनाथ गोपनपाळे,मनोज संकाये,मकरंद नरवणे,संतोष पंचाक्षरी,जगदीश मिटकर,शिरीष सलगरे,कैलास रिकीबे,संदीप चौधरी,गणेश स्वामी,राहुल निर्मळे,योगेश स्वामी,गिरीष बेंबळगे,रवी मिसाळ,प्रशांत नरवणे,अरविंद चौधरी,अनिल मिसाळ,रमेश चौधरी सर,अनिल(बाळू)चौधरी व समाज बांधवांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment