Wednesday, June 26, 2024

नाशिक येथील क्रीडा व संस्कृती फाउंडेशन द्वारा दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.डॉ.गजानन सवने सन्मानित.

घाटनांदुर (प्रतिनिधी)येथील वसुंधरा महाविद्यालयातील हिंदी विभागात कार्यरत असलेले  प्रा. डॉ. गजानन सवने यांना  नाशिक येथील क्रीडा व संस्कृती फाउंडेशन द्वारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद कामत शंकरवाल यांच्या हस्ते नाशिक येथे प्रदान करण्यात आला. 
प्रा. डॉ.गजानन सवने हे हिंदी विषयाचे प्राध्यापक असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास केंद्राची समन्वयक आहेत. त्यांची दोन पुस्तके व अनेक पत्रिका मध्ये संशोधन परक लेख प्रकाशित झाले आहेत तसेच महाविद्यालयातील होणाऱ्या खेळाच्या स्पर्धेत ते सहभागी असून विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करतात. या पुरस्कार प्रदान समारंभाचे  अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते ऍड. गोरखनाथ बलकवडे तर प्रमुख पाहुणे ऑलम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, प्रा. डॉ. बलवंत सिंह, सुशील देशमुख यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 
या यशाबद्दल कामधेनू संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब देशमुख, सचिव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य गोविंदराव देशमुख,प्राचार्य डॉ. अरुण दळवे उपप्राचार्य  डॉ. अर्जुन मोरे प्रा. डॉ.मनीषा देशमुख ,कार्यालयीन अधीक्षक उमेश सरनाईक प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ सह  महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment