परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील भुमीपूत्र असलेले व सध्या नांदेड पोलिस दलातील कर्मचारी दत्ता गायकवाड यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासून 75 वेळा रक्तदान समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
14 जुलै हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली हा दिन साजरा केला जातो. परळीचे भूमीपूत्र असलेले व नांदेड पोलिस दलातील पोलिस कर्मचारी श्री दत्ता गायकवाड यांनी आजपर्यंत 75 वेळा रक्तदान करून अनेकांना जीवदान दिल्याची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. या कर्मचार्याने वयाच्या 18 व्या वर्षापासून अविरतपणे रक्तदान करण्याची सेवा सुरू ठेवली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
परळीचे भुमीपूत्र असलेले व सध्या नांदेड पोलिस दलातील पोलिस कर्मचारी दत्ता शिवाजीराव गायकवाड यांनी 2004 पासून सुरू केलेली सेवा आजतागायत मागील 20 वर्षांपासून रक्तदानाची सेवा बजावत आहे. दरम्यान पोलिस कर्मचारी दत्ता गायकवाड यांनी सांगितले की, ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम शहरात करतो. समाजामध्ये रक्तदान केल्यामुळे शरीराला धोका होतो असा गैरसमज असून रक्तदानामुळे आपल्याला कोणाचा जीव वाचवण्याची संधी मिळते तसेच आपले आरोग्य सुदृढ होते हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे असे म्हटले आहे.
दत्ता गायकवाड यांनी आजपर्यंत अनेकांना जीवदान दिल्याची ही घटना केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायीही आहे. मागील 20 वर्षांपासून त्यांनी समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. एक युनिट रक्तामुळे तीन जीव वाचू शकतात. अशा परिस्थितीत, 75 वेळा रक्तदान केल्याने असंख्य लोकांना नवीन जीवन मिळाले असेल. या पोलिस कर्मचार्याने त्यांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण कामातही वेळ काढून नियमित रक्तदान केले आहे.
No comments:
Post a Comment