अंबाजोगाई (प्रतिनिधी) पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने घटस्फोटाची तक्रार दिल्याच्या कारणावरून दारुड्या पतीने पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून पळून गेला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान त्याने आपल्या बहिणीला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे.हि घटना अंबाजोगाई शहरातील अंबिका कॉलनीत सोमवारी दि.30 रोजी रात्री घडली.
मयूर कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून भाग्यश्री काही दिवसापासून ‘मानवलोक’ संस्थेच्या मनस्विनी प्रकल्पात राहत होती आणि तिथूनच तिने मयूर विरुद्ध घटस्फोटाची तक्रार दिली होती. सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास मयुरने भाग्यश्रीला रुग्णालयाच्या बाहेर बोलावले आणि ते दोघे अंबिका कॉलनीतील हनुमान मंदिराकडे गेले. तिथे मंदिरासमोर मयूरने सोबत आणलेला चाकू बाहेर काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने
भाग्यश्रीच्या पोटात भोसकले
आणि निघून गेला. हा वार एवढा भयंकर होता कि भाग्यश्रीच्या पोटातील आतडी बाहेर आली.भाग्यश्री काम करत असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी
तिला जखमी अवस्थेत तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे भाग्यश्रीवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून अद्यापही तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीवैद्यकीय सूत्रांनी दिली.याप्रकरणी कोमल पंचारिया यांच्या फिर्यादीवरून मयूर शर्मा याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास एपीआय जाधवर करत आहेत.दरम्यान, हल्ला करून मयूर शर्माफरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान आरोपी मयूर शर्मा याने पत्नीवर प्राणघात हल्ला केल्यानंतर आपल्या बहिणीला फोन करून मी तिचं काम केलं आहे. आता तुझा नंबर आहे. अशी जीवे मारण्याची धमकी दिली. मयूर शर्माची बहीण यांनी तात्काळ अंबाजोगाई पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी भावा विरोधात तक्रार केली आहे.
No comments:
Post a Comment