बीड (प्रतिनिधी): नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्यास शेकापने विरोध केला आहे. हा महामार्ग रद्द करावा, ही मागणी घेऊन बीडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. अगोदर संघर्ष समितीच्या २२ मागण्या पूर्ण करा. तेव्हाच महामार्गाचे काम सुरू करा. अन्यथा बीड जिल्ह्यात महामार्ग होऊ देणार नाही; असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी दिला.
नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे वतीने भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ महामार्ग बाधीत १२ जिल्ह्यामध्ये बाधीत शेतकरी संपर्क संवाद दौरा सुरू आहे. त्या निमित्ताने ते आज बीड जिल्ह्यात आले असून महामार्ग होऊ देणार नाहीत; असा इशारा भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.
गोव्यापासून ते नागपूरपर्यंत तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग केला जात आहे. हा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जात आहेत. या बदल्यात त्याचा मोबदला कमी दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असल्याने याला तीव्र विरोध केला जात आहे. दरम्यान यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अशा घोषणाबाजी देखील करण्यात आल्या. तसेच सक्तीने भूसंपादन करणार असाल तर २२ मागण्या पूर्ण करा. तेव्हाच महामार्गाचे काम सुरू करा. अन्यथा बीड जिल्ह्यात महामार्ग होऊ देणार नाही; असा इशारा देखील देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment