Friday, April 26, 2024

वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान निवडणुकी च्या बंदोबस्ताला हजेरी न लावल्यामुळे दोन पोलीसांवर गुन्हा दाखल.


बीड (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीशी संबंधित बंदोबस्तासाठी 370 अंमलदारांना वर्धा येथे पाठवण्या बाबत आदेश देण्यात आले होते. मात्र दोन अंमलदारांनी बंदोबस्ताच्या ठिकाणी हजेरी न लावल्यामुळे बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना बीड जिल्ह्यातून 370 अंमलदारांना वर्धा येथे बंदोबस्तासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये पाटोदा पोलीस ठाण्याचे अंमलदार

संजय दशरथ गांगुर्डे व परळी येथील संभाजी नगर ठाण्यातील हरिदास शामराव गित्ते यांनी बंदोबस्ताला हजेरी लावली नाही.हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेल्या आदेशाचे दोन्ही अंमलदार यांनी पालन न केल्याने जिल्हा विशेष शाखेचे शरद कोंडीराम निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment