Saturday, April 20, 2024

बीडसह मावळमध्ये बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर कारवाई, लाखाेंचा मुद्देमाल जप्त.

बीड (प्रतिनिधी)   लाेकसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर बीड आणि मावळ येथून सुमारे सहा लाख रुपयांची दारू पकडण्यात आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी संशयितांवर कडक कारवाई केली आहे. लाेकसभा निवडणुकीच्या कालावधीत गैरप्रकार हाेऊ नये यासाठी खासगी वाहनांच्या तपासणीची मोहीम वाढविणार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले. 

बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. या नाकाबंदीत एक लाख 28 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यापुढेही अशाच पद्धतीने वाहनांची तसेच अवैध दारू विक्रीची तपासणी केली जाणार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.


No comments:

Post a Comment