परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील जगद्गुरू पलसिध्द महास्वामी पिठाचे 28 वे मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांना 14 मार्च पासून सुरू होणार्या जागतिक ग्लोबल आध्यात्मिक महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे.
हार्टफुलनेसचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय, भारतातील चेगुर गावाजवळ स्थित कान्हा शांती वनम, चौदाशे एकरमध्ये पसरले असून जगातील सर्वात मोठे ध्यान हॉल आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील हैदराबादपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅम्पसमध्ये सुमारे 40 हजार सहभागी सामावून घेऊ शकतात. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय, हार्टफुलनेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनकर, कमलेश पटेल, एसआरसीएम बाबा रामदेव, माता अमृतानंद मायल, हरजिंदर सिंग धामी एससीपीसी, गोविंद गिरी महाराज गीता परिवार, डॉ. इमाम उमर अहमद इल्यासी, चिन्ना जेयर बहेणि शिवानी ब्रह्मा कुमारी, आचार्य लोकेश, ओसवाल्ड ग्रेशियस, डॉ. जयंती एस. रवी ऑरविले फाउंडेशन, सद्गुरु ईशा फाउंडेशन श्री श्री रविशंकर, वेन गेशे दोरजी तिबेट हाऊस श्रीमंत स्वामी गौतमानंद, आरके मिशन बीके मृत्युंजय, ब्रह्मा कुमारिस, स्वामी चिदानंद परहर्थ निकेतन, श्री राकेश भाल एसआरसीएम जैन, पूज्य आनंद भन्ते, बौद्ध भिक्षु, शेखर कपूर, व्यंकटेश अभिनेता आणि निर्माता, अभिनेत्री कृती शेट्टी, शेखर कपूर, शंकर महादेवन उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शंभर देशातील संत सहभागी होणार आहेत. 17 मार्च रोजी ह्या संमेलनाचा समारोप होणार आहे. जगभरातील दहा लाख भाविक या संमेलनात सहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment