Monday, February 5, 2024

ठेवी बुडविणाऱ्या मल्टीस्टेट बँकांचे ठेवी दार रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालया समोर रस्ता अडवत मांडला ठिय्या.


*बीड जिल्ह्यातील जिजाऊ, साईराम, ज्ञानराधा, राजस्थानी, मराठवाडा अर्बन, द्वारकादास नागरी यासह इतर मल्टीस्टेट बँकांनी गतवर्षी गाशा गुंडाळून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत.

बीड
 (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील नामांकित मल्टीस्टेट बँकांनी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत. याच विरोधात आज  बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवीदारांच्या वतीने दणका मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता अडवत ठिय्या मांडला.
बीड जिल्ह्यातील जिजाऊ, साईराम, ज्ञानराधा, राजस्थानी, मराठवाडा अर्बन, द्वारकादास नागरी यासह इतर मल्टीस्टेट बँकांनी गतवर्षी गाशा गुंडाळून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत. या सर्व बँकांमध्ये ठेवी परत मिळाल्या नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून ठेवीदार मल्टीस्टेट बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळावे; अशी मागणी करत शेकडो ठेवीदार रस्त्यावर उतरले आहेत.  मल्टीस्टेट बँकेच्या संचालकांनी ठेविदारांचे पैसे न दिल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला. 

दहा दिवसांची मुदत 

दरम्यान ठेवीदारांच्या सुरु असलेल्या आंदोलनस्थळी पतसंस्थाचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितल्यानंतर ठेवीदारांच्यावतीने ती देण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास आता थेट आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे सचिन उबाळे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment