Sunday, February 4, 2024

ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लॉजमध्ये नेवुन बलात्कार !


बीड (प्रतिनिधी) १० वी च्या वर्गात शिकणा-या अल्पवयीन मुलीला बळजबरीने लॉजमध्ये नेवुन तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना वडवणी येथे उघडकीस आली आहे. बीड — परळी रोडवरील सदिच्छा हॉटेलमधील लॉजवर नेवुन नराधमाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. सदरील नराधम हा अल्पवयीन असुन गुन्हेगारी वृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे.                       वडवणी येथे पीडित अल्पवयीन मुलगी दि. २३ जानेवारी २०२४ रोजी मैत्रिणीसोबत शाळेत जात असतांना त्या ठिकाणी पांढ-या रंगाच्या कारमध्ये आलेल्या आरोपीने पिडीतेला तुझ्या मैत्रिणीला मारहाण होत असुन तिने तुला बोलावले आहे, असे सांगितले. त्यानंतर पिडीतेला कारमध्ये बसवून बीड रोडला असलेल्या सदिच्छा हॉटेलमधील लॉजवर नेले. त्या ठिकाणी तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने पीडिते ला मारहाण देखील केली. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी नराधमाविरूध्द वडवणी पोलीस ठाण्यात कलम ३७६, ३७६ (आय) (आय), ३२३, ५०६ भादंविसह कलम ४, ८, १२ पोस्को प्रमाणे शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी मुलाविरूध्द आणखी एका मुलीने तक्रार दिल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असुन त्याच्याविरूध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची चर्चा आहे. पीडित मुलगी शुक्रवारी सकाळी १० वाजता वडवणी – पोलीस ठाण्यात गेली होती, मात्र गुन्हा दाखल केला जात नव्हता. दोन्ही बाजुचे लोक आणि राजकीय नेते ठाण्यामध्ये आलेले होते. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment