Saturday, February 17, 2024

अंबाजोगाईत तीन चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून पतसंस्थेच्या कॅशियरला 39 लाखाला लुटले.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) पतसंस्थेत दिवसभरात जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी घेऊन निघालेल्या कॅशियरला तीन चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवला. त्याच्याजवळ असलेली 39 लाख रुपयांचे रक्कम लुटली. ही घटना शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी च्या रात्री अंबाजोगाई घडली

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील प्रख्यात राजर्षी शाहू पतसंस्थेचे कॅशियर गणेश देशमुख हे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दैनंदिन कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत दुचाकीवरून निघाले होते. ते मुकुंदराज कॉलनीत आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या तिन चोरटय़ांनी त्यांना अडविले. स्वतः जवळील पिस्तूल काढून त्यांनी ती देशमुख यांच्या डोक्याला लावली. पिस्तूल आणि त्यासोबत चाकूचा धाक दाखवून त्यांनी देशमुख यांच्याकडील 39 लाख रुपये रक्कम असलेली बॅग घेतली आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली‌‌. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून भर वस्तीत घडलेल्या या घटनेने शहरात

खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment