
माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव – गढी रोडवरील फुले पिंपळगाव शिवारातील कुणाल कापूस जिनिंगला दुपारच्या वेळी अचानक आग लागली. या आगीत पंधरा हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला.

माजलगाव शहराजवळ असलेल्या कुणाल कापूस जिनिंगला मशीनमध्ये झालेल्या स्पार्कने फायर होऊन आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने जिनिंगमध्ये असलेला जवळपास १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. माजलगाव अग्निशामन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आणण्यास अपयश आले. त्यानंतर बाजार समितीचे सचिव हरिभाऊ सोनवणे यांनी पाथरी मानवत येथील अग्निशामन दलाच्या गाड्याला पाचरण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याआगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
No comments:
Post a Comment