Tuesday, January 9, 2024

माणुसकीला काळिमा फासणारी घटना !आठ महिन्याच्या मुलीला पोत्यात भरून रस्त्याव फेकलं.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) स्त्री भ्रूणहत्या कमी करण्यासाठी शासनाने अनेक कडक नियम बनवले असले तरी; ग्रामीण भागात विशेषत: स्त्री भ्रूणहत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या दुष्काळी बीड जिल्ह्यात मात्र.! अजूनही मुलगी नकोशीच असल्याचे जाणवत आहे. 

आजतागायत स्त्री भ्रूणहत्येच्या अनेक घटना समोर आल्या असून, अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बीड जिल्ह्यात एका अज्ञाताने 8 महिन्यांच्या मुलीला पोत्यात गुंडाळून परळीपासून 6 किलोमीटर अंतरावर मालेवाडी रोडवर फेकून दिलं असल्याचे समोर आले आहे. सदर घटनेची एका सतर्क नागरिकाने पोलिसांना फोनवरून माहिती दिली असता; त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या 8 महिन्याच्या चिमुकलीचे प्राण वाचवण्यात आले आहेत. सध्या या 8 महिन्याच्या चिमुकल्या मुलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहप्राप्त माहितीनुसार.! परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने रात्री 9 च्या सुमारास फोन करून माहिती दिली की, मालेवाडी रोड लगत एका मुलीला पोत्यात गुंडाळून फेकलं आहे. मात्र हे क्रूर कृत्य कुणी केलं हे मला माहित नाही. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या टीमसह सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते घटनास्थळी दाखल झाले. त्यांना एक 8 महिन्यांची मुलगी तिचं अर्धशरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत आढळून आली. संबंधित पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर चिमुकल्या मुलीस परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी मुलीवर ताबडतोब उपचार सुरू केले. पोटात अन्न पाणी नसल्याकारणाने चिमुकली फारच अशक्त झाली होती. मात्र उपचारानंतर तिची तब्येत चांगली होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही चिमुकली नेमकी कुणी फेकली? निदर्यी मातेनी फेकली की अन्य काही प्रकार आहे ? याचा देखील तपास सुरू आहे. दरम्यान यामुळं परळीसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे

No comments:

Post a Comment