रतलाम - पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य यजमान म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला मंदिरातील गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता आहे.मात्र या गोष्टीला ओदिशामधील जगन्नाथपुरी मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी विरोध केला आहे.
रतलाम येथे संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मी २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार नाही. तिथे मोदी लोकार्पण करतील. मूर्तीला स्पर्श करतील. मग मी तिथे उभा राहून टाळ्या वाजवून केवळ जयजयकार करू का? माझ्या पदाची एक मर्यादा आहे. राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही शास्रांनुसार झाली पाहिजे. अशा सोहळ्याला मी का जाऊ.
No comments:
Post a Comment