Wednesday, January 3, 2024

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्यावतीने पत्रकार संघाचे दर्पणकार पुरस्कार जाहिर.


*पीटीआय मुंबईचे प्रमुख विलास तोकले बीडचे भूषण, ज्येष्ट संपादक सर्वोत्तम अण्णा गावस्कर बीडचे दर्पणकार, अब्दुल कलाम पेपर विक्रेते म्हणून भिमराव गुरव, इलेक्ट्रॉनिकमधून महेंद्र मुधोळकर, न्युज पोर्टलमधून संग्राम धन्वे, युट्यूब सोशल मिडीयामधून संतोष ढाकणे, उर्दू मिडीयामधून मकदूम काझी, इंग्रजी माध्यमातून सी.आर.पटेल आणि हिंदी माध्यमातून अनिल भंडारी यावर्षीच्या पुरस्काराचे ठरले मानकरी. 


बीड (प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्यावतीने दर्पणदिन मान्यवरांना सन्मानीत करून साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी बाळशास्त्री जांभेकर बीडचे भूषण या पुरस्काराचे मानकरी पीटीआय मुंबईचे प्रमुख विलास तोकले, तर बीडचे दर्पणकार म्हणून दै.सुराज्यचे संपादक सर्वोत्तम अण्णा गावस्कर यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानीत करण्यात येणार आहे.


बीड येथील स.मा.गर्गे भवन येथे शनिवार दि.6 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण या दिनाचे औचित्य साधून पत्रकारसंघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ट संपादक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्पणदिन साजरा करण्यात येतो. यावर्षी बाळशास्त्री जांभेकर बीडचे भूषण या पुरस्काराने पीटीआय मुंबईचे प्रमुख विलास तोकले यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. तर बीडचे दर्पणकार म्हणून दै.सुराज्यचे ज्येष्ट संपादक सर्वोत्तम अण्णा गावस्कर यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. यासोबतच राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दूल कलाम उत्कृष्ट पेपर विक्रेता म्हणून आष्टीचे ज्येष्ट पेपर विक्रेते भिमराव गुरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बाळशास्त्री जांभेकर उर्दू दर्पणकार म्हणून दै.तामीरचे ज्येष्ट संपादक मकदूम काझी यावर्षीचे मानकरी ठरले आहेत. यावर्षीपासून पहिल्यांदाच बाळशास्त्री जांभेकर इंग्रजी दर्पणकार म्हणून ज्येष्ट पत्रकार सी.आर.पटेल यांना सन्मानीत केले जाणार आहे. तर बाळशास्त्री जांभेकर हिंदी दर्पणकार म्हणून ज्येष्ट पत्रकार अनिल भंडारी यांना सन्मानीत केले जाणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक न्युज मिडीयामधून यावेळी टीव्ही 9 चे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांना सन्मानीत केले जाणार आहे. न्युज पोर्टलमधून यावर्षी पहिल्यांदाच पुरस्कार दिला जाणार असून त्याचे पहिले मानकरी संग्राम धन्वे ठरले आहेत. युट्यूब, सोशल मिडीयामधून देखील यावर्षी पासून पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे देखील पहिले मानकरी मुक्त पत्रकार संतोष ढाकणे ठरले आहेत. या पुरस्कारार्थींना लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानीत केले जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास बीड जिल्ह्यातील पत्रकारांसह पत्रकारप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment