Thursday, January 4, 2024

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून निवृत्तीनंतर पदभार देण्यास टाळाटाळ; सुट्टीच्या दिवशी वाटली लाखोंची देयके!नव्या क्रीडा अधिकाऱ्यांचे आयुक्तांना पत्र.


बीड (प्रतिनिधी) बीडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी निवृत्तीच्या आदल्या दिवशी सुट्टी असताना देखील संस्थांना अनुदानापोटी 32 लाख 88 हजार 840 रुपयांचे धनादेश वाटप केले.याची कार्यालयात नोंदही नाही.कार्यालयातून धनादेश पुस्तकही गायब आहे.तसेच नवे जिल्हा क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण यांना पदभार देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी क्रीडा अधिकारी यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे ‌

बीडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख या 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाल्या.त्यांची दोन वर्षाची कारकीर्द सूमार राहिली.मात्र निवृत्त होण्याच्या आदल्या दिवशी 30 डिसेंबरला शासकीय सुट्टी असताना देखील सुहासिनी देशमुख यांनी कार्यालयीन कर्मचारी महेश गोरे याच्याकडून धनादेश पुस्तिका घेऊन अनुदाना पोटी संस्थांना 32 लाख 88 हजार 840 रुपयांचे धनादेश वाटप केले. दरम्यान धनादेशामार्फत वाटप केलेली रक्कम कार्यालयाच्या बँक खात्यातून वजा देखील झाली आहे. धनादेश वाटप केल्यानंतर याची कार्यालयात कुठेही नोंद नाही.तसेच धनादेश पुस्तिका देखील गायब आहे. सुहासिनी देशमुख या 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार होत्या 30 व 31 डिसेंबरला सुट्टी असल्यामुळे त्यांनी नव्या क्रीडा अधिकाऱ्याकडे 29 डिसेंबर लाच नियमाप्रमाणे पदभार द्यायला हवा होता. मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी पदभार देण्यास टाळाटाळ केली. शेवटी एक हाती पदभार घेण्याची वेळ माझ्यावर आली असल्याचं पंडित चव्हाण यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, सोमवार दि. एक जानेवारी रोजी उशिरा श्रीमती देशमुख यांनी पंडित यांच्याकडे पदभार सोपविला.

No comments:

Post a Comment