बीड (प्रतिनिधी) विनापरवाना तीन गावठी कट्टे विक्रीसाठी आणले असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून केलेल्या कारवाईत तीन गावठी लोखंडी पिस्टल सोबतच चार जिवंत काडतूसासह कुख्यात आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळवले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत कुख्यात आरोपी सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान हा गावठी पिस्टल विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळतात त्यांनी पाठक मंगल कार्यालयापासून छोट्या प्रधान याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याला पकडल्यानंतर त्याच्या जवळ असलेल्या पिशवीतून तीन लोखंडी गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसं असा एक लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान रा. स्वराज्य नगर ह.मु. क्रांतीनगर बीड याच्या विरोधात जबरी चोरी, दरोडा, घरफोडी चोरी व आर्म एक्टस् नुसार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्रीराम खटावकर पो.ह. मनोज वाघ, पो.ना. प्रसाद कदम विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे देविदास जमदाडे विकी सुरवसे नारायण कोरडे अशोक कदम यांनी पार पाडली.
No comments:
Post a Comment