मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ व तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात तेलंगणा वगळता तिन्ही राज्यात भाजपने विजय प्राप्त केला आहे. या निकालामध्ये भाजपला मिळालेल्या यशाचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवत विजयी उत्सव साजरा केला आहे.
बीडमध्ये फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद
तीन राज्यात भाजपाची सत्ता स्थापन झाल्यानंतर बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोष केला आहे. फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ढोल ताशाच्या गाण्यावर ठेका देखील धरला. या निकालावरून आगामी काळातील चित्र स्पष्ट झाले असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह दिसून येतो आहे. हेच चित्र आगामी काळात देशातील सर्व ठिकाणी पाहायला मिळेल असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment