नागपूर (प्रतिनिधी) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या हिवाळी अधिवेशनाचे आज बुधवारी (20 डिसेंबर) सूप वाजले. यादरम्यान विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधानपरिषदेचे कामकाज सायंकाळी 7.13 वाजता स्थगित करताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विशेष अधिवेशनाची तारीख आणि वेळ जाहीर केली.तेव्हा मराठा आरक्षणासाठी बोलवावण्यात आलेले विशेष अधिवेशन मुंबईतील विधिमंडळात 26 फेब्रुवारी 2024 रोजी भरणार आहे
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात घेतले गेले. 7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनाचे कामकाज आज 20 डिसेंबरपर्यंत चालले. असे असतानाच हे अधिवेशन गाजले ते अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक सलीम कुत्ता आणि ड्रग्जमाफिया ललित पाटील या विषयावरून. दरम्यान याच अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली परंतू विरोधकांकडून तोच तो तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करण्यात आला. असे असतानाच कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसलेल्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बाहेर राहूनसुद्धा सत्ताधाऱ्यांना नाकेनऊ आणल्याने सरत्या दिवशी विधान परिषदेत त्यांच्यावर हक्कभंग कारवाईचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाकडून मांडला होता. या सर्व गदारोळ विदर्भ आणि वैदर्भीय बाणा दाखवत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरेंचीही शेरेबाजी न विसरता येणारी आहे.
विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा
हिवाळी अधिवेशनात दोन ते तीन दिवस सलग आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. विरोधी पक्षनेत्यासंह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्यांची मुद्दे मांडली
असे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी निवेदन करताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी फेब्रुवारी विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार आता विशेष अधिवेशन मुंबईतील विधिमंडळात 26 फेब्रुवारी भरविण्यात येणार आहे.
जरांगे मागणीवर ठाम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केली असली तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम असून, 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा उभारावे लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment