परळी वैजनाथ ( प्रतिनिधी )दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सदरील हॉलीबॉल स्पर्धेसाठी परळी तालुक्यातून तब्बल वीस संघाने सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेचे उद्घाटन दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य विठ्ठल तुपे सर ,तालुका समन्वयक संजय देशमुख,मुख्याध्यापक फाउंडेशन विद्यालय जी.एस.नागझरे सर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अजय जोशी सर,क्रीडा शिक्षिका संघमित्रा हुमणे, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरण गित्ते , प्रशालेचे प्रेरणास्थान मा श्री किरण गिते साहेब - सचिव, नगर विकास ,सार्वजनिक बांधकाम, उद्योग पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत परळी तालुक्यातील अनेक संघानी आपली छाप पाडत विजय संपादन केला आहे. परळी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेत पुढील संघाने विजय प्राप्त केला. यात
14 वर्ष मुले 1)सर्व प्रथम महाराष्ट्र विद्यालय मोहा
2) सर्व द्वितीय दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ,14 वर्ष मुली 1) प्रथम फाऊंडेशन स्कूल ,17 वर्ष मुले
1) प्रथम फाऊंडेशन स्कूल ,2) द्वितीय भेल स्कूल , 17 वर्ष मुली 1) प्रथम महाराष्ट्र विद्यालय मोहा, 2) द्वितीय फाऊंडेशन स्कूल ,19 वर्ष मुले 1)प्रथम राजश्री शाहू महाराज कॉलेज कौडगाव 2)द्वितीय न्यू हायस्कूल कॉलेज परळी,19 वर्ष मुली 1) न्यू हायस्कूल कॉलेज परळी, जिल्हास्तरीय स्पर्धा बीड येथे 20 व 21 सप्टेंबर ला होणार आहेत. स्पर्धेत पंच म्हणून विजय मुंडे, आरगडे, गुलाबभाई, कदम सर, संदीप यादव, आणि संघमित्रा हुमने यांनी कामगिरी बजावली. सदरील हॉलीबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्यू हायस्कूल परळी वैजनाथ चे क्रीडा शिक्षक, वाघमारे सर, नारायण वानखेडे, विद्यावर्धिनी विद्यालय विजय मुंडे भेल सेकंडरी स्कूलचे राडकर,कांबळे सर पोद्दार लर्न स्कूलचे घोलप सर, कदम सर न्यू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक अनिल इपाते,न्यू हायस्कूल विद्यालय शिरसाळा झांबरे सर,आश्रम शाळा कवडगाव प्राचार्य जाधव सर,उपप्राचार्य ढोकणे सर, चंदू चाटे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment