Thursday, August 24, 2023

आजारी आईला तपासा म्हणत मुलाने डॉक्टरला फेकून मारली वीट.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : आजारी असणाऱ्या आईला तपासा म्हणत मुलाने वेळेअभावी दुसऱ्या दवाखान्यात तुमच्या आईला घेऊन जा म्हणणाऱ्या डॉक्टरला वीट फेकून मारली. ही घटना परळी शहरात घडली असून यामध्ये  डॉक्टर जखमी झाले आहेत. डॉ. सुरेश चौधरी असे डॉक्टरचे नाव आहे. 
परळी शहरातील गणेशपार भागात डॉ. सुरेश चौधरी यांचे हॉस्पिटल आहे. दवाखान्यात २ भाऊ आईला घेऊन आले होते. यावेळी डॉ. चौधरी यांनी 'मला बाहेरगावी जायचे आहे, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात जा' अशी विनंती केली. परंतु, दोन्ही भाऊ ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी आईला तपासा, असा हट्ट धरत अरेरावीची भाषा वापरली. यानंतर त्यांनी डॉ. चौधरी यांच्या छातीवर वीट फेकून मारली. 

डॉक्टरला वीट मारल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नासधूस देखील केली. दरम्यान चौधरी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment