धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव तालुक्यातील वानेवाडी येथील नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा नैसर्गिक मृत्यू नसून मारहाण करून मुलाला लटकवल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रेम शिंदे असं मृत्यूमुखी पडलेल्या
विद्यार्थ्यांचे नाव आहे.
धाराशिव तालुक्यातील वानेवाडीमध्ये वारकरी संप्रदायाची शिक्षण देणारी नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये दहावीत शिकणारा प्रेम शिंदे याचा
मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रेम शिंदे याचा मृतदेह दोरखंडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही आत्महत्या नसून आपल्या मुलाला मारहाण करून लटकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
संस्थाचालक ताब्यात
दरम्यान याप्रकरणी संस्थाचालक उंबरे महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.पोलीस या प्रकरणाचा सध्या कसून तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment