Tuesday, August 29, 2023

राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.खेळ हा प्रत्येकच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे :- सहसचिव धीरज बाहेती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी गंगाखेड रोड महेश नगर येथील राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे आज सकाळी 9वा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला यावेळी हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 
यावेळी सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंह, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनीही पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात दि 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तसे तर प्रत्येक खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ प्रकार पसंत करतो. काहीजण खेळाची आवड करिअरच्या दिशेनं पुढे नेतात. तर काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना फॉलो करत खेळाचा आनंद घेतात. असे  मत यावेळी बोलताना सहसचिव धीरज बाहेती यांनी व्यक्त केले
भारतदेशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे.यात हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद सिंह, लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी असलेले व्यक्तीमत्व दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले  क्रिकेटर सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे. या कार्यक्रमात विविध खेळाडूची माहिती व जीवन चरित्र विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दात व्यक्त केले तसेच यावेळी गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले 
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यावेळीअध्यक्ष चंदूलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंह,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्यासह शाळेतील , 
विद्यार्थ्यांचे पालक यांची उपस्थिती होती.
हा जागतिक क्रीडा दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले अशी माहिती शाळेचे  प्राचार्य मंगेश काशीद यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment