Wednesday, July 12, 2023

स्कूलबसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ ! RTO लक्ष देईल का?

बीड (प्रतिनिधी) : स्कूल बसच्या नावाखाली चिमुकल्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे असा प्रकार बीड जिल्ह्यातील तेलगाव येथील एका विद्यालयाच्या नजीक उघडकीस आला आहे. स्कूल बसमध्ये एक दाेन नव्हे चक्क 80 विद्यार्थी यांना मेंढरा सारखं कोंडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
स्कूल बसमध्ये मेंढरं कोंडल्यासारखे लहान मुलांना बसवून शाळेसाठी वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या तेलगाव येथील जिजामाता प्राथमिक विद्यालय उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये देखील विद्यार्थ्यांना  बसवले जात असून त्यांच्या सुरक्षेचं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्कूल बसचे नियम धाब्यावर बसवून एका स्कूल बसमध्ये 70 ते 80 विद्यार्थी बसवत आहेत. 10 ते 15 विद्यार्थी बसच्या केबिनमध्ये बसवले जातात. तर काही ड्रायव्हरच्या बाजूला उभे केले जातात. तसेच एका सिटवरती तीन ते चार विद्यार्थी बसवले जातात.

अनेक विद्यार्थी हे उभा राहून प्रवास करत आहेत. यामुळे अवैध विद्यार्थी प्रवास वाहतूक थांबवावी अशी मागणी केली जात आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी देखील मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment