सदर संतापजनक प्रकार बीडपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांमध्ये घडला आहे. यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारी टोळी ऍक्टिव्ह झाल्याचं उघडकीस आले आहे. याप्रकरणी नराधम आरोपी रणजित शिवदास शेंडगे याच्यासह त्याला साथ देणारा भाऊ पवन शिवदास शेंडगे, जालिंदर खामकर, योगेश शेंडगे यासह ९ जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार, पोस्कोसह अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला.
दबाव टाकून सोडायला लावले गाव
विशेष म्हणजे हा नराधम आरोपी आणि त्याचे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत या पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला गावातून पुण्याला जाऊन रहा, असा दबाव देखील टाकला. त्यानंतर नराधम आरोपी पीडित कुटुंबाला पुणे येथे सोडून आले. दरम्यान हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या मामाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडीतेसह तिचे आई वडील गायब असल्याची तक्रार केली. तर पीडितेच्या चुलत भावाने आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराची माहिती पत्राद्वारे राज्य महिला आयोगाकडे केली. यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. दबाव टाकून गावातून बाहेर नेऊन सोडलेल्या पीडित कुटुंबाला चाईल्ड लाईनचे सदस्य तत्त्वशील कांबळे यांच्यासह पोलिसांनी १५ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर शोधण्यास यश आले आहे.
No comments:
Post a Comment